राज्यातून नैऋत्य मोसमी पावसाने (Monsoon) माघार घेतली असली तरी, आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) सावट निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, आजपासून म्हणजेच २१ ऑक्टोबरपासून पुढील पाच दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचे इशारे देण्यात आले आहेत. विशेषत: दिवाळीच्या (Diwali) तोंडावर आलेल्या या पावसाच्या शक्यतेमुळे नागरिकांना सण-समारंभ आणि प्रवासाचे नियोजन जपून करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Diwali Rain Alert)
(हेही वाचा – Konkan Railway च्या प्रवाशांना दिलासा! आता ‘या’ कारणांमुळे गाड्या वेळेवर धावणार; प्रवाशांचा वेळ वाचणार )
कोणत्या विभागांना इशारा?
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकण, गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच, विदर्भातील काही जिल्ह्यांना देखील पावसाचा ‘यलो अलर्ट’ (Yellow Alert) देण्यात आला आहे. या काळात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या खरीप पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांची चिंता वाढली
गेल्या काही महिन्यांमध्ये मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये घरे, जनावरे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीतून सावरत असतानाच, आता ऐन दिवाळीच्या तोंडावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा आल्याने शेतकरी आणि नागरिक वैतागले आहेत. शेतीतील काढणीला आलेले पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.
(हेही वाचा – H-1B व्हिसावरील निर्बंध शिथील होणार?; ट्रम्प प्रशासनाने दिले स्पष्टीकरण)


