First Fruit Village : साताऱ्यातील ‘या’ गावाला राज्यातील पहिल्या फळांच्या गावाचा बहुमान

कृषि आयुक्त सुनिल चव्हाण यांच्या उपस्थितीत मेगा फूड पार्क येथे झालेल्या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली.

182
First Fruit Village : साताऱ्यातील 'या' गावाला राज्यातील पहिल्या फळांच्या गावाचा बहुमान
First Fruit Village : साताऱ्यातील 'या' गावाला राज्यातील पहिल्या फळांच्या गावाचा बहुमान

सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यामधील धुमाळवाडी हे गाव राज्यातील पहिले फळांचे गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे. कृषि आयुक्त सुनिल चव्हाण यांच्या उपस्थितीत मेगा फूड पार्क येथे झालेल्या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली.
धुमाळवाडी गावात शेतकऱ्यांनी १९ विविध प्रकारची फळबाग लागवड केली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पेरु, सिताफळ, डाळिंब, आवळा, चिंच, अंजिर, केळी, जांभुळ, ड्रॅगनफ्रुट, द्राक्षे, चिकू, लिंबू, संत्रा, बोर नारळ, आंबा, पपई अशा विविध फळांचा समावेश सलग लागवडीमध्ये आहे.

तसेच बांधावरती सफरचंद, स्टार फ्रुट, लिची, काजू, फणस, करवंद, खजुर या फळझाडांची लागवड केली आहे. ही फळबाग लागवड रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत तसेच काही शेतकऱ्यांनी स्वतःहून लागवड केली आहे. कृषि विभागाच्या विविध मेळावे, प्रशिक्षण, मार्गदर्शनाखाली फळबाग लागवड क्षेत्र वाढीसाठी मदत झाली तसेच शेतकऱ्यांनी फळबाग लागवड करावी म्हणून विविध उपक्रम सुरु केले.

(हेही वाचा – Indian Army: पप्पा घरी कधी येणार; प्रश्न अनुत्तरीतच, पुण्याच्या भवानी पेठेतील जवान दिलीप ओझरकर कारगिल येथे हुतात्मा)

या फळबागामुळे फळांचे उत्पादन त्याचबरोबर फळप्रक्रिया उद्योग, फळांची निर्यात यामध्ये गावाची प्रगती दिवसेंदिवस झपाट्याने होत आहे. कृषि विभागाच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी उत्पादित फळांचे गावातच प्रक्रिया करुन विक्री व्यवस्थापन करण्यासाठी तसेच फळप्रक्रिया उद्योगाचे जाळे विस्तारण्यासाठी या गावातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेचा लाभ देऊन नवउद्योजक तयार करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.