Devendra Fadnavis : ड्रगमाफिया ललित पाटील प्रकरणाचे उद्धव ठाकरेंसोबत कनेक्शन, फडणवीसांचा खळबळजनक दावा

61
Devendra Fadnavis : ड्रगमाफिया ललित पाटील प्रकरणाचे उद्धव ठाकरेंसोबत कनेक्शन, फडणवीसांचा खळबळजनक दावा
Devendra Fadnavis : ड्रगमाफिया ललित पाटील प्रकरणाचे उद्धव ठाकरेंसोबत कनेक्शन, फडणवीसांचा खळबळजनक दावा

ड्रगमाफिया ललित पाटील ससून रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला होता. गेल्या काही दिवसांपासून पोलीस त्याचा मागावर होते. राज्यभरात या प्रकरणाविषयी प्रचंड चर्चा सुरू होती. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) मुंबईत पत्रकार परिषद झाली. यामध्ये ड्रगमाफिया ललित पाटील प्रकरणात त्याने महत्त्वाचं भाष्य केलं असून उद्धव ठाकरे (uddhav thackery) आणि ललित पाटील  यांच्या कनेक्शनबाबत महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा त्यांनी यावेळी केला आहे.

विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर ताशेरे ओढताना ललित पाटील प्रकरणात सत्ताधाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी झालेल्या परिषदेत गौप्यस्फोट केला. यावेळी फडणवीसांनी ललित पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यातील कनेक्शनवर बोट ठेवल्यामुळे आता ठाकरे गट त्यांच्या या विधानाला कशा प्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

(हेही वाचा – Hardik Pandya Injury Update : हार्दिक पांड्याविषयी कर्णधार रोहीतने दिला ‘हा’ अपडेट  )

ललित पाटीलला डिसेंबर २०२० मध्ये अटक झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते. उद्धव ठाकरे यांनी ललित पाटील याच्याकडे तेव्हाच्या शिवसेनेचे नाशिक जिल्ह्याचे प्रमुखपद होते. ललित पाटीलला अटक झाल्यावर लगेच पीसीआर मागण्यात आला. गुन्हा मोठा असल्याने या प्रकरणात लगेच पीसीआर देण्यात आला. ललित पाटीलला पीसीआर मिळाल्यावर त्याला लगेच ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर सरकारी पक्षाकडून ललित पाटीलच्या चौकशीसाठी कोणताही अर्ज करण्यात आला नाही.

पोलिसांकडून ललित पाटील याची चौकशीच झाली नाही. पीसीआरचा १४ दिवसांचा कालावधी संपल्यानंतर ललित पाटील याला एमसीआर द्यावा लागला. या काळातही त्याची चौकशीच झाली नाही. चौकशी झाली नसेल तर उद्या एखाद्या आरोपीविरुद्ध न्यायालयात खटला भरायला झाला तर तो कसा भरणार?, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ललित पाटीलची चौकशी का झाली नाही? यामागील कारण काय होतं? या सगळ्याला उद्धव ठाकरे जबाबदार होते की गृहमंत्री जबाबदार होते. ललित पाटीलची चौकशी न करण्यासाठी कोणाचा दबाव होता. या प्रकरणात खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. पण मी त्या आत्ताच सांगणार नाही, असे सांगत देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणातील सस्पेन्स कायम ठेवला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.