Hardik Pandya Injury Update : हार्दिक पांड्याविषयी कर्णधार रोहीतने दिला ‘हा’ अपडेट 

रोहीत शर्माला अर्थातच सामन्या नंतरच्या पत्रकार परिषदेत हार्दिक पांड्या विषयी प्रश्न विचारण्यात आले. त्याने दुखापत फारशी गंभीर नाही हे स्पष्ट केलंय. पण, पुढील सामन्यात तो खेळेल हा सांगण्याचं मात्र टाळलं

22
Hardik Pandya Injury Update : हार्दिक पांड्याविषयी कर्णधार रोहीतने दिला ‘हा’ अपडेट 
Hardik Pandya Injury Update : हार्दिक पांड्याविषयी कर्णधार रोहीतने दिला ‘हा’ अपडेट 

ऋजुता लुकतुके

भारताचा अव्वल अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya Injury Update)  बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात जायबंदी झाला. त्याचा पाय मुरगळल्यावर त्याला ते षटकही पूर्ण करता आलं नाही. उरलेले तीन चेंडू विराटने टाकले. आणि हार्दिक उर्वरित सामन्यातही मैदानात उतरला नाही.

भारतीय संघाचा पुढचा सामना न्यूझीलंड विरुद्ध धरमशाला इथं आहे. आणि हे दोन्ही संघ आतापर्यंत या स्पर्धेतील अपराजित संघ आहेत. त्यामुळे भारताचा न्यूझीलंड विरुद्धचा सामना ही वर्चस्वाची लढाई असेल. आणि या सामन्यात अष्टपैलू हार्दिक पांड्याचा सहभागही भारतासाठी महत्त्वाचा असेल.

अशावेळी भारतीय कर्णधार रोहीत शर्माने हार्दिकच्या दुखापतीचं स्वरुप फारसं गंभीर नसल्याचं स्पष्ट केलंय. हार्दिकच्या पायाचा घोटा सुजला आहे. उद्या सकाळी त्याची अवस्था काय आहे हे पाहून आम्ही पुढची दिशा ठरवू. संघाचा खेळ चांगला होतोय. आणि लोकांचाही भरभरून पाठिंबा मिळतोय, याबद्दल आम्ही खूश आहोत,‘ असं रोहीत हार्दिकविषयी बोलताना म्हणाला.

(हेही वाचा-Sachin Tendulkar : मास्टर ब्लास्टरच्या पुतळ्याचे वानखेडे स्टेडियमवर ‘या दिवशी’ होणार अनावरण)

ही दुखापत किरकोळ आहे, असा शब्दप्रयोगही त्याने केला. पण, त्याचवेळी आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तो खेळल का याविषयी रोहीतने काहीही सांगितलं नाही.

सामन्यातील नववं षटक हार्दिक पांड्या टाकत असताना त्याला ही दुखापत झाली. हार्दिकच्या चेंडूवर बांगलादेशी सलामीवीर लिट्टन दासने सरळ फटका मारला. आणि फॉलो थ्रू दरम्यान तो अडवताना हार्दिक तोल जाऊन पडला. आणि त्याचा डावा पाय दुमडला गेला. थोड्याशा उपचारानंतर त्याने गोलंदाजीचा प्रयत्न केला. पण, धावण्यात अडचण येत असल्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं.

भारताचा न्यूझीलंड विरुद्धचा सामना लगेचच २२ ऑक्टोबरला धरमशाला इथं होणार आहे. आणि तोपर्यंत हार्दिक तंदुरुस्त झाला नाही तर भारताला सुर्यकुमार यादव किंवा महम्मद शामी यांचा पर्याय निवडावा लागणार आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.