Demat Accounts in India : फेब्रुवारीत सलग तिसऱ्या महिन्यात ४० लाख नवीन डिमॅट खाती

शेअर बाजार नवीन उच्चांक करत असल्यामुळे डिमॅट खात्यांची संख्याही वाढते आहे. 

87
Demat Accounts in India : फेब्रुवारीत सलग तिसऱ्या महिन्यात ४० लाख नवीन डिमॅट खाती
  • ऋजुता लुकतुके

भारतीय आणि एकूणच जागतिक शेअर बाजार कोव्हिडची मरगळ झटकून टाकून आता कामाला लागले आहेत. आणि नवीन उच्चांकाबरोबरच शेअर बाजारात गुंतवणूक करण्याकडे लोकांचा ओढा वाढत आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये सलग तिसऱ्या महिन्यात नवीन डीमॅट खाती उघडणाऱ्यांची संख्या ४० लाखांपेक्षा जास्त होती. (Demat Accounts in India)

फेब्रुवारी महिन्याचा ताजा आकडा आहे ४३ लाखांचा. आणि त्यामुळे देशातील एकूण डीमॅट खात्यांची संख्या आता १४.८३ कोटींवर पोहोचली आहे. डिसेंबर आणि जानेवारीत उघडलेल्या नवीन डीमॅट खात्यांची (Demat Accounts) संख्या अनुक्रमे ४०.९० आणि ४३.६० लाख इतकी होती. डीमॅट खात्यांची संख्या वाढल्यामुळे देशातील कंपन्या आणि पर्यायाने उत्पादन क्षेत्रातील गुंतवणूक वाढणार असली तरी गुंतवणूकदारांनीही शेअर बाजारात थेट गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी असा इशारा तज्ज्ञ देत आहेत. (Demat Accounts in India)

(हेही वाचा – Paris Olympic 2024 : भारतीय टेबल टेनिस संघ पहिल्यांदाच ऑलिम्पिकसाठी पात्र)

गुंतवणूकदारांनी योग्य ती काळजी घ्यावी

‘बाजार उच्चांकावर असताना शेअरच्या किमती वाढलेल्याच असतात. आणि अशावेळी गुंतवणूक केली तर सुरुवातीच्या कालावधीसाठी का होईना पण, शेअर काही काळाने खाली येण्याची शक्यता असते. त्यामुळे नवीन गुंतवणूकदार बाजारात आल्या आल्याच त्यांना धक्का बसू शकतो. त्यामुळे नवीन गुंतवणूक स्वागतार्ह असली तरी गुंतवणूकदारांनी योग्य ती काळजी घेतली पाहिजे. शेअर बाजाराचा अभ्यास आणि जोखीम स्वीकारण्याची तयारी बघून गुंतवणूक केली पाहिजे,’ असं कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज् या संस्थेनं आपल्या ताज्या अहवालात म्हटलं आहे. (Demat Accounts in India)

शिवाय चीनमधील मंदीचं संकट, रशिया-युक्रेन युद्ध आणि मध्य-पूर्वेतील परिस्थिती यामुळेही शेअर बाजारात उतार चढाव बघायला मिळू शकतात, असा इशाराही या अहवालात देण्यात आला आहे. (Demat Accounts in India)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.