Pollution : दिल्ली आणि मुंबई जगभरातील दहा प्रदूषित शहरांच्या यादीत

दिल्ली जगभरातील सर्वात जास्त प्रदूषित शहर ठरले आहे

116
Pollution : दिल्ली आणि मुंबई जगभरातील दहा प्रदूषित शहरांच्या यादीत
Pollution : दिल्ली आणि मुंबई जगभरातील दहा प्रदूषित शहरांच्या यादीत

स्वित्झर्लंड येथील आयक्यूएअर (IQAir) या पर्यावरणाबाबत काम करणाऱ्या ग्रुपने जगभरातील पहिल्या दहा प्रदूषित शहरांची यादी तयार केली आहे. या यादीत दिल्ली जगभरातील सर्वात जास्त प्रदूषित शहर ठरले आहे. तर देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईला चौथे स्थान मिळाले आहे. पहिल्या दहा प्रदूषित शहरांच्या यादीत कोलकाता शहराला सहावे स्थान देण्यात आले आहे. दहा शहरातील हवेचा दर्जा नोंदवल्याची वेळ आणि ठिकाण आयक्यूआरच्या (IQAir) अहवालात नमूद करण्यात आलेली नाही. पर्यावरण अभ्यासकांच्या मते, या नोंदी हिवाळ्यात तसेच वाहतूक कोंडीच्या वेळेत नोंदवल्या गेल्या आहेत. हिवाळा आणि वाहतूक कोंडीत हवेचा दर्जा फारच ढासळलेला असतो.

दिल्लीतील हवेचा दर्जा ४६०!

आयक्यूएअर (IQAir) हा ग्रुप युनायटेड नेशन्स एनव्हायरमेंटल प्रोग्रामसाठी तांत्रिक सहकार्यही करतो. भारतात हिवाळ्यात हवेतील सूक्ष्म कण जसेच्या तसेच राहतात. वाऱ्यांचा वेग मंदावल्याने सूक्ष्म धुलिकण हलत नाहीत. परिणामी हिवाळ्यात देशातील बहुतांश भागात वायू प्रदूषण आणि दृश्यमानतेचे दुष्परिणाम दिसून येतात. या काळात राजधानी दिल्लीत परिस्थिती फारच बिकट होते. या दिवसांत माणसाच्या आरोग्यावरही घातक परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. परिणामी दिल्लीत या दिवसांत शाळांना सुट्टी दिली जाते. आयक्यूएअरच्या (IQAir) नोंदीत दिल्लीत हवेचा दर्जा ४६० पर्यंत नोंदवला गेला. ही नोंद जगभरात जास्त होती.

(हेही वाचा – Meri Mati, Mera Desh : ‘मेरी माटी, मेरा देश’; होणार सन्मान शूरवीरांचा …)

मुंबईतील हवेचा दर्जा १६९ वर!

जगभरातील पहिल्या दहा प्रदूषित शहरांच्या यादीत पाकिस्तान देशातील लाहोर शहराचे नाव नोंदवले गेले. लाहोर येथे हवेचा दर्जा ३२८ पर्यंत पोहोचल्याचे निरीक्षण आयक्यूएअरने (IQAir) नोंदवले. तिसऱ्या स्थानावर चीनमधील चेंगडू शहराला स्थान मिळाले. चेंगडू येथील हवेचा दर्जा १७६ तर त्याखालोखाल मुंबईतील हवेचा दर्जा १६९ वर दिसून आला. परिणामी मुंबईला प्रदूषित शहरांच्या यादीत चौथे स्थान दिले गेले.

कोलकाता येथील हवेचा दर्जा १६५ वर!

पाकिस्तानातील कराची शहराला पाचवे स्थान देण्यात आले. कराचीतील हवेचा दर्जा १६९ पर्यंत नोंदवला गेला. सहाव्या स्थानावर मात्र भारतातील कोलकाता शहर निवडले गेले. कोलकाता येथील हवेचा दर्जा १६५ पर्यंत नोंदवला गेला.

कोलकाता खालोखाल बलगेरिया येथील सोफियेत १६४ पर्यंत पोहोचलेला हवेचा दर्जा सातव्या स्थानावर, बांगलादेशमधील ढाका शहरातील हवेचा दर्जा १६० पर्यंत पोहोचल्याने आयक्यूआरने (IQAir) ढाका शहराला आठवे स्थान दिले. सरबीया आणि इंडोनेशिया देशातील बेलग्रेड आणि जकार्ता शहराला नववे आणि दहावे स्थान मिळाले. बेलग्रेड येथे हवेचा दर्जा १५९ तर जकार्ता शहरात १५८ पर्यंत हवेचा दर्जा नोंदवला गेला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.