Deepak Kesarkar : आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावर दीपक केसरकर यांचे टीकास्त्र, आताची लहान मुलं काहीही बोलतात !

72

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला जर्मनी आणि ब्रिटन दौरा अचानक रद्द केला. यावरून मंत्र्यांच्या परदेशी दौऱ्याबाबत (Foreign visits of ministers) आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावरून आदित्य ठाकरे ‘डर अच्छा है’, असे म्हणाले होते. यावरून मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची टीका केली आहे.

याबाबत मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, अनेकांना हल्ली वाटू लागलंय की, आमचे दौरे रद्द होतात, पण आमचे दौरे रद्द होण्याची कारणं वेगळी आहेत. त्यामुळे कावळा बसायला आणि फांदी तुटायला, असं झालं आहे. आताची लहान मुलं काहीही बोलतात. त्यांना एनर्जी बार लावू नका, असे म्हणत मंत्री दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे.

(हेही वाचा – Self Defense Training : स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे डोंबिवली येथे आत्मसंरक्षण प्रशिक्षण वर्ग सुरू )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.