Self Defense Training : स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे डोंबिवली येथे आत्मसंरक्षण प्रशिक्षण वर्ग सुरू

वीर सावरकर यांनी १०० वर्षांपूर्वी मांडलेले विचार आज आणि यापुढे कित्येक वर्षे आचरणात आणण्याची गरज आहे

66
Self Defense Training : स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे डोंबिवली येथे आत्मसंरक्षण प्रशिक्षण वर्ग सुरू
Self Defense Training : स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे डोंबिवली येथे आत्मसंरक्षण प्रशिक्षण वर्ग सुरू

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन ‘स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थे’तर्फे (Swatantryaveer Samajik Sanstha)  महाराष्ट्रात विविध उपक्रम राबवले जातात. महिलांनी स्वसंरक्षण करण्याकरिता सक्षम असले पाहिजे. वीर सावरकर यांच्या या विचारातून प्रेरणा घेऊन संस्थेतर्फे महिलांसाठी आत्मसंरक्षण वर्ग (Self Defense Training) सुरू करण्यात आले आहेत.

महिलांना स्वत:चे संरक्षण स्वत: करता यावे, या उद्देशाने या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. हा प्रशिक्षण वर्ग दोन महिने कालावधीसाठी डोंबिवली येथील टिळक नगर शाळेत दर शनिवारी सायंकाळी भरणार आहे. हा प्रशिक्षण वर्ग आशियाई ज्युडोमध्ये सुवर्णपदक विजेत्या पूर्वा मॅथूज लोकरे (Asian Judo gold medalist Purva Mathews Lokre) घेणार आहेत.

(हेही वाचा – Nose- Ear-Throat Specialist: डीजेच्या आवाजामुळे कानांच्या तक्रारी वाढल्या; तज्ज्ञांनी दिला सल्ला, वाचा सविस्तर…)

संस्था स्तरावर प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी संस्थेच्या शाखा होत आहेत त्या सर्वच ठिकाणी हा उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस आहे. जेणेकरून सर्वच स्तरातील स्त्रियांना अतिशय माफक शुल्कात या प्रशिक्षणाचा लाभ घेता येईल. या उपक्रमाबाबत माहिती देताना संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी म्हणाले की, वीर सावरकर दूरदृष्टीने विचार करणारे नेते होते. त्यांनी १०० वर्षांपूर्वी मांडलेले विचार आज आणि यापुढे कित्येक वर्षे आचरणात आणण्याची गरज आहे. स्त्रियांनी स्वत:चे रक्षण करण्याकरिता स्वत: समर्थ झाले पाहिजे. हा त्यांचाच मांडलेला विचार आज संस्था प्रत्यक्ष कृतीत उतरवत आहे. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी असे वर्ग सुरू केले जाणार आहेत. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त गृहिणी आणि विद्यार्थिनींनी या वर्गात नोंदणी करण्याचे आवाहन केले जात आहे.

या उपक्रमासाठी महिला कार्यकारणी सदस्य सौ. नीलिमा कोडोलीकर, ऋजुता सावंत, किमया कोल्हे, डॉ. वृषाली राजवाडे व स्वाती गोगटे यांनीही पुढाकार घेतला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.