Suspected ISIS Terrorist : बक्षिस जाहिर करण्यात आलेल्या दहशतवाद्याला अटक

90
Suspected ISIS Terrorist : बक्षिस जाहिर करण्यात आलेल्या दहशतवाद्याला अटक
Suspected ISIS Terrorist : बक्षिस जाहिर करण्यात आलेल्या दहशतवाद्याला अटक

पुणे दहशतवादी मॉड्यूल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) मोस्ट वॉन्टेड यादीतील संशयित दहशतवादी मोहम्मद शाहनवाज याला दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने अटक केली आहे. मोहम्मद शाहनवाज याच्यासह चार फरार आरोपीवर एनआयएने ३ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. मोहम्मद शाहनवाज याला नवी दिल्लीत लपून बसला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (Suspected ISIS Terrorist)

शाहनवाज उर्फ ​​शफी उजमा हा एनआयएच्या मोस्ट वाँटेड यादीत होता आणि त्याच्या डोक्यावर ३ लाख रुपयांचे इनाम होते. त्याला आणि त्याच्या दोन दहशतवादी साथीदारांना रविवारी रात्री एनआयए, दिल्ली पोलिस आणि पुणे पोलिसांच्या छाप्यांमध्ये अटक करण्यात आली. छाप्यांदरम्यान, शाहनवाजच्या घरात इम्प्रोव्हायझ्ड एक्सप्लो सिव्ह डिव्हाईस (आयईडी) बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या द्रव रसायनासह साहित्य मिळुन आले आहे. तपासा दरम्यान, हे उघड झाले की शाहनवाज आणि त्याच्या पुणे मॉड्यूलचे सदस्य परदेशातील हँडलर्सच्या सूचनांच्या आधारे दिल्लीसह उत्तर भारतात दहशतवादी हल्ले करण्याची योजना आखत होते. (Suspected ISIS Terrorist)

(हेही वाचा – BMC Commissioner : महापालिका आयुक्तांना, मुख्यमंत्र्यांचा एक महिन्याचा अल्टीमेटम)

शाहनवाज हा पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणात हवा होता. तो दिल्लीचा रहिवासी असून पुणे पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला होता. अटक होण्यापूर्वी तो दिल्लीत लपून बसला होता. एनआयएने मोहम्मद शाहनवाज, तल्हा लियाकत खान, रिझवान अब्दुल हाजी अली आणि अब्दुल्ला फैयाज शेख यांना अटक करणाऱ्या माहितीसाठी ३ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करून चारही फरार दहशतवाद्यांचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले होते. (Suspected ISIS Terrorist)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.