Weather update : देशभरासह राज्यातील तापमानात घट ; मुंबई, पुणे, नाशिककर गारठले

राज्यात गारठा कायम असून मुंबईसह उत्तर महाराष्ट्र गारठला आहे. तर उत्तर भारतात कुठे पाऊस तर कुठे बर्फवृष्टी असे तापमान असल्याचे पाहावयास मिळत आहे.

130
Weather update : देशभरासह राज्यातील तापमानात घट ; मुंबई, पुणे, नाशिककर गारठले
Weather update : देशभरासह राज्यातील तापमानात घट ; मुंबई, पुणे, नाशिककर गारठले

हिमाचल प्रदेशात कुठे बर्फवृष्टी तर कुठे पाऊस होत आहे. तसेच राज्यात थंडीचा पारा चांगलाच घसरला आहे. मराठवाड्यांनतर मुंबई आणि ठाण्यातही थंडी वाढली. सध्या मुंबईतील पारा १९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. मुंबईत सकाळी आणि रात्री थंडी आहे. तर पुणे आणि नाशिक मध्ये तापमान ९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. तर महाबळेश्वरचे तापमान १५ अंशावर घसरले आहे. त्यामुळे एकंदरीतच संपूर्ण राज्यात सगळेजण गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहेत. (Weather update)

कसे असेल मुंबईचे तापमान
मुंबईत दिवसा तापमान ३५.५ इतके असते तर रविवारी(२४ डिसेंबर) रात्री १८.९ पर्यंत तापमान घसरले होते. हे या थंडीतील आत्तापर्यंतचे सर्वात कमी तापमान असल्याची नोंद झाली आहे. तर पुढील काही दिवस तापमानात अशीच काहीशी चढ-उतार असल्याचे पाहावयास मिळणार असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे.

(हेही वाचा : Israel-Hamas Conflict : गाझामध्ये सापडले भुयाराचे मोठे जाळे, आतील व्यवस्था पाहून इस्रायली लष्कराने व्यक्त केले आश्चर्य)

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत थंडी कायम राहणार
अरबी समुद्रातील चक्रीवादळ आणि वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे येत्या काही दिवसात राज्यासह देशाच पारा घसरणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. तर रब्बी पिकांसाठी ही थंडी फायदेशीर ठरणार आहे. तसेच डोंगराळ भागात बर्फवृष्टीमुळे उत्तर भागात थंडी वाढल्याने तेथून येणाऱ्या वाऱ्याचा महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम झाला आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज तज्ञांनी नोंदविला आहे.

उत्तर भागात बर्फवृष्टी होणार 
उत्तर भारतात (North India) मैदानी भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. डोंगराळ जिल्ह्यात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.परिणामी काश्मीरच्या खोऱ्यात पाऊस आणि बर्फवृष्टी होणार असून तापमानाचा पारा आणखी खाली घसरणार आहे. या बर्फवृष्टीमुळे येथील स्थानिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. तीन हजार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.