Israel-Hamas Conflict : गाझामध्ये सापडले भुयाराचे मोठे जाळे, आतील व्यवस्था पाहून इस्रायली लष्कराने व्यक्त केले आश्चर्य

279
Israel-Hamas Conflict : गाझामध्ये सापडले भुयाराचे मोठे जाळे, आतील व्यवस्था पाहून इस्रायली लष्कराने व्यक्त केले आश्चर्य
Israel-Hamas Conflict : गाझामध्ये सापडले भुयाराचे मोठे जाळे, आतील व्यवस्था पाहून इस्रायली लष्कराने व्यक्त केले आश्चर्य

इस्रायलच्या लष्कराला उत्तर गाझामधील जबालिया येथे हमासने तयार केलेल्या मोठ्या भुयाराचा शोध लागला आहे. याच ठिकाणी डिसेंबरच्या सुरुवातीला ओलिस ठेवलेल्या ५ इस्रायलींचे मृतदेहही सापडले आहे. आयडीएफला जबालिया छावणी परिसरात ओलिसांचे मृतदेह असल्याची माहिती मिळाली होती. त्यांचा शोध घेत असताना एका ठिकाणी भुयाराच्या खांबाचा शोध लागला. त्यानंतर एक भलेमोठे भुयाराचे (मोठे जाळेच) नेटवर्कच आयडीएफने शोधून काढले. ज्यामध्ये एक लिफ्ट, एक मोठे सभागृह आणि कमांड सेंटर असून बोगद्यात असलेली लिफ्ट डझनभर मीटर खाली जात असल्याची माहिती इस्रायल लष्कराने दिली आहे.

इस्त्रायल लष्कराने सांगितले की, या भुयाराचे नेटवर्क दूरवर पसरलेले होते. याचा वापर हमासने युद्धाकरिता केला होता. या भुयाराच्या परिसरातील शाळा आणि रुग्णालयाखालून जाणाऱ्या इतर काही भुयारांचाही शोध लष्कराला लागला.

(हेही वाचा – Scientific Progress : वर्ष २०२३ मधील भारताची वैज्ञानिक प्रगती!)

भुयारांच्या माध्यमातून युद्ध 
आय. डी. एफ. म्हणते की, हमास गाझामध्ये भुयारांच्या नेटवर्कच्या माध्यमातून लढत आहे. हमासचा गाझा प्रमुख याह्या सिनवार आणि लष्करी प्रमुख मुहम्मद डेफ यांनी बोगद्याच्या नेटवर्कद्वारे ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला करण्याची योजना आखली होती, ज्यामध्ये १,२०० लोक मारले गेले आणि २५० लोकांचे अपहरण झाले. गाझाचे भुयारांचे जाळे नष्ट करण्यासाठी इस्रायली सैन्य सातत्याने काम करत आहे, अशी माहिती इस्रायलने दिली आहे.

बोगद्यात शस्त्रेही सापडली
या भुयारात शस्त्रे आणि शस्त्रे बनवण्याच्या पायाभूत सुविधादेखील उपलब्ध असल्याचे आय. डी. एफ. ने म्हटले आहे. १३ डिसेंबर रोजी या भागात २ मृतदेह सापडले होते. नंतर भुयाराच्या दुसऱ्या भागात आणखी ३ मृतदेह सापडले. आय. डी. एफ. चे म्हणणे आहे की, परिसराची छाननी पूर्ण केल्यानंतर, आय. डी. एफ. ला आढळले की भुयाराचे विशाल जाळेच नष्ट झाले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.