Dahisar Highway Toilet : दहिसर जकात नाक्याच्या जवळ उभारणार अद्ययावत हाय-वे शौचालय

द्रुतगती महामार्गावर सार्वजनिक शौचालयाची उभारणी करण्याची मागणी होत असतानाच पश्चिम द्रुतगती महामार्गावर दहिसर जकात नाक्याच्या ठिकाणी या शौचालयाची उभारणी केली जाणार आहे.

108
Dahisar Highway Toilet : दहिसर जकात नाक्याच्या जवळ उभारणार अद्ययावत हाय-वे शौचालय
Dahisar Highway Toilet : दहिसर जकात नाक्याच्या जवळ उभारणार अद्ययावत हाय-वे शौचालय

द्रुतगती महामार्गावर सार्वजनिक शौचालयाची उभारणी करण्याची मागणी होत असतानाच पश्चिम द्रुतगती महामार्गावर दहिसर जकात नाक्याच्या ठिकाणी या शौचालयाची उभारणी केली जाणार आहे. स्त्री, पुरुष, शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्तिकरीता तसेच तृतीय पंथी या करिता शौचालय व युरीनलची सुविधा तसेच महिला शौचालयात नॅपकीन व्हेडींग मशीन, चेंजिंग रुम, बाळांना स्तनपान करण्याची जागा व बाळांना डायपर बदलण्याच्या जागेसह वाहनतळाची सुविधा असणार आहे. तब्बल पावणे तीन कोटी रुपये खर्च करून या हाय-वे शौचालयाची उभारणी केली जाणार आहे. (Dahisar Highway Toilet)

मुंबई शहराच्या सर्वागीण विकासाकरीता मुंबई सुशोभिकरण अभियान राबविण्यात येत असून राज्याचे मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांच्या सुचनेनुसार मुंबई महापालिका क्षेत्राच्या अखत्यारीत असलेल्या पूर्व द्रुतगती मार्ग व पश्चिम द्रुतगती मार्ग यालगत नागरीकांच्या सुविधेकरीता अद्ययावत सार्वजनिक शौचालयाची उभारणी करण्याच्या निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार दहिसर (पू) येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावर दहिसर जकात नाक्यामधील मोकळ्या जागेतील एका कोपऱ्यात द्ययावत सर्व सोयीसुविधायुक्त हायवे सुविधा शौचालयाची उभारणी करण्यात येत आहे. महापालिकेच्यावतीने बांधण्यात येणाऱ्या या शौचालयासाठी विविध करांसह २ कोटी ७८ लाख ५७ हजार रुपये खर्च करण्यात येणार असून यासाठी पायल कंस्ट्रक्शन कंपनीची निवड करण्यात आली आहे. महापालिकेच्या अंदाजित २.८३ कोटी रुपयांच्या अंदाजित दराच्या तुलनेत २.१९ कोटी रुपयांमध्ये उणे २२ टक्के दराने हे काम या कंपनीने बोली लावून मिळवले आहे. (Dahisar Highway Toilet)

(हेही वाचा – Crime : ठाण्यातील मनोरुग्णालयात जेवणाचे कंत्राट देण्यावरून फसवणूक, ५ जणांविरोधात गुन्हा दाखल)

महापालिकेच्या घाटकोपर एन विभागाच्यावतीने पूर्व द्रुतगती मार्गावर एका अद्ययावत सार्वजनिक शौचालयाची उभारणी करण्यात आली आहे. या हाय वे शौचालयाच्या धर्तीवरच पश्चिम द्रुतगती मार्गावरील दहिसरमध्ये शौचालय उभारले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या शौचालयामध्ये स्त्री, पुरुष, शारीरीकदृष्ट्या विकलांग व्यक्तिकरीता तसेच तृतीय पंथी या करिता शौचालय व युरीनलची सुविधा असेल. तसेच महिला शौचालयात नॅपकीन व्हेडींग मशीन, चेंजिंग रुम, बाळांना स्तनपान करण्याची जागा व बाळांना डायपर बदलण्याची जागाही असेल. याशिवाय पिण्याच्या पाण्याची सोय, सोलार पॅनल, वॉटर प्यूरिफायर, मोबाइल चार्जिंग स्टेशन, एटीएम सुविधा, सीसीटीव्ही कॅमेरा, रेन वॉटर हार्वेस्टींग, काळजीवाहकासाठी खोली तसेच या शौचालयास लागणारा विद्युत पुरवठा व पाणी पुरवठा, दुचाकी व चारचाकी वाहनांकरीता पार्किंग व्यवस्था आदी सुविधा असेल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (Dahisar Highway Toilet)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.