Indian Cricket Team : भारतीय क्रिकेट संघाचा नवीन उपकर्णधार ठरला; राहुल द्रविडने केली घोषणा

92

भारतीय क्रिकेट संघा (Indian Cricket Team) तील महत्वाचा खेळाडू म्हणून ओळख असलेल्या हार्दिक पांड्या याचा पाय मुरगल्यामुळे विश्व चषकातील उर्वरित महत्वाच्या सामान्यांना हार्दिक मुकला आहे, त्यांची रिकव्हरी होत नाही त्यामुळे अखेर भारतीय क्रिकेट संघातील उप कर्णधाराची नवीन नियुक्ती करण्यात आली आहे.

हार्दिक पांड्या वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर बीसीसीआयने विकेटकीपर बॅट्समन केएल राहुलची नवीन उपकर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. हार्दिक पांड्या घोट्याच्या दुखापतीमुळे 2023 च्या वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी प्रसिध कृष्णाचा संघात समावेश करण्यात आला आहे. बोर्डाने केएल राहुलकडे उपकर्णधारपद सोपवले आहे.

(हेही वाचा Diwali Festival 2023 : आधीच वेळेवर पगार नाही, बोनस नाही, त्यातच परे आणि मरेचा मेगाब्लॉक; दिवाळीच्या खरेदीवर सावट)

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती. त्यानंतर पांड्याला न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्ध पुनरागमन करता आले नाही. शनिवारी आयसीसीने पांड्या यापुढे विश्वचषक खेळू शकणार नसल्याचे जाहीर केले. पांड्या बाहेर पडल्यानंतर वरिष्ठ निवड समितीने केएल राहुलची उपकर्णधारपदी नियुक्ती केली. 2023 च्या विश्वचषकात उपांत्य फेरीतील सामना सोडून टीम इंडियाला अजूनही दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्सविरुद्ध खेळायचे आहे.

राहुलला आता विशेष जबाबदारी मिळणार

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी केएल राहुलची उपकर्णधारपदी नियुक्ती केली. आतापर्यंत, केएल राहुल यष्टिरक्षक म्हणून गोलंदाजांच्या मीटिंगमध्ये भाग घेत होता, आता उपकर्णधार म्हणून, गोलंदाज आणि फलंदाजीसह सर्व संघ मीटिंगचा भाग असतील. संघ व्यवस्थापनही राहुलसोबत प्रत्येक विषयावर चर्चा करणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.