मुंबईत कोरोना रुग्णसंख्या २००च्या घरात!

सोमवारी दिवसभरात ३ रुग्णांचा मृत्यू झाला.

79

मागील काही दिवसांपासून कोविड रुग्णांची संख्या ३००च्या आसपास स्थिरावलेली असतानाच सोमवारी रुग्णसंख्येचा आकडा पुन्हा खाली घसरलेला पाहायला मिळाला आहे. दिवसभरात केवळ २०८ कोविड रुग्ण आढळून आले असून ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेले हे तिन्ही रुग्ण दीर्घकालिन आजाराचे होते. अर्थात कोविड चाचणींची संख्या कमी झाल्याने ही रुग्णसंख्या कमी आढळून आली असली, तरी प्रत्यक्षात कमी होणारी रुग्णसंख्या ही मुंबईकरांना दिलासा देणारी ठरत आहे.

दिवसभरात ३ रुग्णांचा मृत्यू 

मुंबईत रविवारी जिथे ३३ हजार ९३५ कोविड चाचणी केल्यानंतर ३२३ रुग्ण आढळून आले होते. तर सोमवारी २६ हजार ४४५ कोविड चाचण्या केल्यानंतर २०८ नवीन रुग्ण आढळून आले. तर दिवसभरात ३७२ रुग्ण बरे होवून घरी परतले. संपूर्ण मुंबईत एकूण ३ हजार ९६१ कोविड बाधित रुगण विविध ठिकाणच्या रुग्णालय व कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. सोमवारी दिवसभरात ३ रुग्णांचा मृत्यू झाला होता. हे तिन्ही रुग्ण दीर्घकालिन आजारी होते. यामध्ये १ पुरुष आणि २ महिलांचा समावेश होता. यातील २ रुग्णांचे वय ६० वर्षांवर आहे तर एका रुग्णांचे वय ४० ते ६० वयोगटातील आहे.

(हेही वाचा : मलिकांच्या तोंडीही आता ‘नानां’ची भाषा!)

संपूर्ण मुंबईत केवळ एकमेव झोपडपट्टी, चाळ कंटेन्मेंट झोनमध्ये

मुंबईत कोविड बाधित रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर झोपडपट्टी व चाळींमधील रुग्णसंख्याही घटू लागली. त्यामुळे अशा झोपडपट्टी व चाळी कंटेन्मेंट झोनमुक्त होवू लागल्या आहेत. संपूर्ण मुंबईत केवळ एकमेव झोपडपट्टी व चाळ कंटेन्मेंट झोनमुक्त झाली आहे. तर संपूर्ण मुंबईत सीलबंद इमारतींची संख्या ३५ एवढी आहे.

माहिम कोविडमुक्त

धारावी, माहिम आणि दादर या महापलिकेच्या जी उत्तर विभागात सोमवारी दिवसभरात केवळ २ रुग्णच आढळून आले. धारावी व दादरमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले. तर माहिममध्ये एकही रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे या तिन्ही विभागांमध्ये एकूण २०८ रुग्ण असून त्यांच्यावर विविध ठिकाणच्या रुग्णालयांमध्ये तसेच कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. सध्या उपचार सुरु असलेल्या या रुग्णांपैकी धारावीमध्ये सर्वांत कमी म्हणजे ३६ आहे. तर माहिम व दादरमध्ये अनुक्रमे ७१ व १०१ उपचार घेत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.