घटस्थापनेपूर्वी सहाशेपार, घट उठण्यापूर्वी सहाशेच्या आत

मुंबईतील झोपडपट्ट्या व चाळी या सक्रिय कंटेन्मेंटची संख्या शून्य असून, सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ५७ एवढी आहे.

116

मुंबईत कोविडबाधित रुग्ण संख्येचा आकडा वर-खाली होत असतानाच, पुन्हा एकदा रुग्ण संख्येने पाचशेच्या पुढे मजल मारली आहे. घटस्थापनेपूर्वी सहाशे पार गेलेल्या कोविडबाधित रुग्णांचा आकडा घट उठण्याच्या आधीच म्हणजेच गुरुवारी सहाशेच्या आतच राहिला आहे. गुरुवारी दिवसभरात ५४६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात केलेल्या एकूण ३७ हजार ७ कोविड चाचण्यांमधून ५४६ रुग्णसंख्या आढळून आली आहे. तर दिवसभरात ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

अशी आहे आकडेवारी

मुंबईत गुरुवारी दिवसभरात ३३७ बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले, तर ५४६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात ३७ हजार ७ चाचण्या केल्यानंतर ५४६ नवीन रुग्ण आढळून आले, तर बुधवारी ३१ हजार ६३८ चाचण्या करण्यात आल्या होत्या, त्यामध्ये ४८१ नवीन रुग्ण आढळून आले. बुधवारी दिवसभरात जिथे ३ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तिथे गुरुवारी ५ रुग्णांचा मृत्यू झाला. या पाचही मृत्यू पावलेल्या रुग्णांपैकी ४ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. यामधील दोन रुग्ण पुरुष आणि ३ महिलांचा समावेश होता. ४ रुग्णांचे वय हे साठीपार होते, तर उर्वरित एक रुग्णांचे वय चाळीशीच्या आतील होते.

असा आहे रुग्णवाढीचा दर

बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ९७ टक्के असून, मागील आठवड्यात मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर हा ०.०६ टक्के एवढा आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर हा १ हजार १५१ दिवस एवढा आहे. मुंबईतील झोपडपट्ट्या व चाळी या सक्रिय कंटेन्मेंटची संख्या शून्य असून, सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ५७ एवढी आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.