Conversion : ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातूनही धर्मांतरण

गाझियाबादच्या राजनगरमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांचे म्हणणे आहे की, त्यांचा अल्पवयीन मुलगा मागील काही दिवसांपासून विचित्र वागत होता.

136
Conversion : ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातूनही धर्मांतरण

ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून एका अल्पवयीन मुलाचे धर्मांतरण (Conversion) करण्यात आल्याचे धक्कादाय प्रकरण उत्तरप्रदेशच्या गाझियाबद येथे उघडकीस आले आहे. हा मुलगा घरी खोटं बोलून 5 वेळा नमाजसाठी जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केलीय. गाझियाबादच्या कविनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, मुंबईत राहणाऱ्या एका मुस्लिम व्यक्तीने आपल्या मुलाचा धर्म बदलल्याचा आरोप केला आहे.

गाझियाबादच्या राजनगरमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांचे म्हणणे आहे की, त्यांचा अल्पवयीन मुलगा मागील काही दिवसांपासून विचित्र वागत होता. तो दिवसातून 5 वेळा जिमला जाण्याच्या नावाखाली घराबाहेर पडत असे आणि काही तासांनी परत यायचा. त्यांना संशय आल्यानंतर त्यांनी मुलाचा पाठलाग केला आणि तो संजय नगर सेक्टर-23 येथील मशिदीत नमाज (Conversion) अदा करण्यासाठी जात असल्याचे समजले. हे पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. चौकशी केल्यावर मुलाने सांगितले की, इस्लाम इतर धर्मांपेक्षा चांगला आहे, म्हणून त्याने हा धर्म स्वीकारला आहे. पीडितेच्या वडिलांचे म्हणणे आहे की, त्यांनी आपल्या मुलाचा मोबाईल आणि लॅपटॉप गुपचूप तपासला असता इस्लाम धर्मासंबंधी सर्व साहित्य सापडले, त्यापैकी काही कायद्याच्या विरोधातील आहे.

(हेही वाचा – Delhi Sakshi Murder Case : “होय, मीच मारलं”, १६ वर्षीय प्रेयसीला संपवणाऱ्या साहिलची कबुली)

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मुलाची ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून मुंबईतील रहिवासी असलेल्या बद्दो नामक मुस्लिम (Conversion) तरुणाशी ओळख झाली. बद्दोने सुमारे 2 वर्षांपूर्वी आपल्या मुलाला संगणकाचे पार्ट विकले होते, त्या बदल्यात मुलाने जुलै 2021 मध्ये बद्दोला 20 हजार रुपये दिले होते. तेव्हापासून त्यांचा मुलगा बद्दोच्या प्रभावाखाली असल्याचे वडीलांनी सांगितले. तो त्याच्याशी तासनतास बोलतो. याशिवाय, इतरही अनेक नंबर आहेत, ज्याच्या तो संपर्कात आहे. वडिलांचे म्हणणे आहे की, त्यांना मुलाच्या धर्मांतराची चिंता आहे.

आपला मुलगा निर्दोष असल्याचे वडिलांचे म्हणणे आहे. मात्र त्याचे धर्मांतर (Conversion) करण्यात आले आहे. आपल्या मुलाचा देशविरोधी कारवायांमध्ये वापर होण्याची भीती त्यांना आहे. संजयनगर सेक्टर-23 येथील धार्मिक स्थळाशी संबंधित लोकांवर कटात सहभाग असल्याचा संशयही वडीलांनी यावेळी व्यक्त केला. याप्रकरणी त्यांनी मंगळवारी (३० मे ) पोलिस आयुक्तांकडे कारवाईची मागणी केली.

हेही पहा – 

यादरम्यान, एसीपी कविनगर अभिषेक श्रीवास्तव यांनी सांगितले की, मुंबईचा रहिवासी असलेला बद्दो आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल (Conversion) करुन तपास सुरु केला आहे. तपासात जे तथ्य समोर येईल त्याआधारे पुढील कारवाई केली जाईल असे श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.