Delhi Sakshi Murder Case : “होय, मीच मारलं”, १६ वर्षीय प्रेयसीला संपवणाऱ्या साहिलची कबुली

साक्षी तिच्या (Delhi Sakshi Murder Case) मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला जात असताना वाटेत साहिलने तिला अडवून तिच्यावर चाकूने अनेक वार केले.

404
Delhi Sakshi Murder Case : ''होय, मीच मारलं'', १६ वर्षीय प्रेयसीला संपवणाऱ्या साहिलची कबुली

सोमवार २९ मे रोजी रात्री पुन्हा एकदा एका घटनेमुळे दिल्ली (Delhi Sakshi Murder Case) हादरली. एका सोळा वर्षीय तरुणीची तिच्या प्रियकरानेच हत्या केली. या घटनेनंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली असून आता आरोपी साहिलने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

”मीच साक्षीची हत्या केली”

पोलीस चौकशीत आरोपी (Delhi Sakshi Murder Case) साहिलला सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यात आली. त्यावेळी त्यानं मान्य केलं की, ”व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती मीच आहे. मीच साक्षीची हत्या केली.” मीडिया रिपोर्टनुसार, आरोपी साहिल आणि साक्षी यांचं एकमेकांवर प्रेम होतं. दोघांमध्ये काहीतरी वाद झाला आणि यानंतर साहिलनं साक्षीचा खून केला. साक्षी आणि साहिल एकमेकांनागेल्या दोन वर्षांपासून सोशल मीडियावर फॉलो करत होते.

(हेही वाचा – Crime : दुबईचे अली पितापुत्र मुंबईतील सोने बाजारातील गोल्ड मॅन)

नेमकं प्रकरण काय?

सोमवार २९ मे रोजी रात्री दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात एका सोळा वर्षीय तरुणीची (साक्षी) रस्त्याच्या (Delhi Sakshi Murder Case) मधोमध वार करून हत्या करण्यात आली. या हल्ल्यात साक्षीचा मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेतील हल्लेखोर हा तरुणीचा प्रियकर साहिल आहे. आरोपी साहिल फ्रीज आणि एसी दुरुस्तीचे काम करतो. साहिलच्या वडिलांचे नाव सरफराज आहे.

हेही पहा – 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साक्षी तिच्या (Delhi Sakshi Murder Case) मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला जात असताना वाटेत साहिलने तिला अडवून तिच्यावर चाकूने अनेक वार केले, त्यानंतर तिला दगडाने ठेचले. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

‘आरोपीला कठोर शिक्षा द्या’, साक्षीच्या आईवडिलांची मागणी

मृत साक्षीच्या (Delhi Sakshi Murder Case) आईने आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत दोषीला फाशी द्यावी असं म्हटलं आहे. तिच्या वडिलांनीही साक्षीच्या मारेकऱ्याला फाशी झालीच पाहिजे असं म्हटलं आहे. “माझ्या मुलीवर अनेक वेळा वार करण्यात आले, तिच्या डोक्याचेही तुकडे करण्यात आले. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी आमची मागणी आहे,” अशी प्रतिक्रिया साक्षीच्या वडिलांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.