Medical Colleges : सावधान! मेडिकलसाठी तयारी करत असाल तर ‘या’ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणे टाळा

ज्या वैद्यकीय महाविद्यालयांची (Medical Colleges) मान्यता केंद्र सरकारनं रद्द केली आहे, त्या महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचं काय होणार? हा मुख्य प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.

112
Medical Colleges :सावधान! मेडिकलसाठी तयारी करत असला तर 'या' महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणे टाळा

एकीकडे नुकताच बारावीचा निकाल लागला आहे. निकालानंतर बरेच विद्यार्थी मेडिकलच्या अभ्यासाची तयारी करत आहेत. तर दुसरीकडे केंद्र सरकारकडून एकूण ४० वैद्यकीय महाविद्यालयांची (Medical Colleges) मान्यता रद्द करण्यात आली आहे.

मोदी सरकारनं देशातील ४० वैद्यकीय महाविद्यालयांची (Medical Colleges) मान्यता रद्द केली आहे. यासोबतच केंद्र सरकारकडून एकूण १५० मेडिकल कॉलेज निगराणीखाली आहेत. याचाच अर्थ असा की, त्यांच्यावरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. चौकशीदरम्यान मान्यता रद्द झालेल्या महाविद्यालयांमध्ये तसेच, तेथील व्यवस्थेत अनेक प्रकारच्या त्रुटी आढळून आल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे. नॅशनल मेडिकल कमिशनच्या यूजी बोर्डानं ही तपासणी केली होती, त्यानंतर या महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

(हेही वाचा – IPL 2023 : यंदाच्या हंगामात बनले ‘हे’ खास विक्रम)

यामुळे मान्यता रद्द…

महाविद्यालयं (Medical Colleges) विहित नियमांचं पालन करत नाहीत आणि आयोगानं केलेल्या तपासणीत सीसीटीव्ही कॅमेरे, आधार-लिंक्ड बायोमेट्रिक हजेरी प्रक्रिया आणि फॅकल्टी रोलशी संबंधित अनेक त्रुटी आढळल्या आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं कठोर पावलं उचलत महाविद्यालयांची मान्यता रद्द केली आहे.

य महाविद्यालयांची मान्यता रद्द

केंद्र सरकारकडून ज्या ४० महाविद्यालयांची (Medical Colleges) मान्यता रद्द करण्यात आली आहेत ती; ती गुजरात, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू, पंजाब, आंध्र प्रदेश, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या राज्यांतील आहेत. तसेच, उर्वरित दीडशे वैद्यकीय महाविद्यालयांची चौकशी अजुनही सुरूच आहे. चौकशीदरम्यान या महाविद्यालयांमध्ये त्रुटी आढळून आल्यास त्यांची मान्यताही रद्द करण्यात येईल, असं केंद्र सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.

हेही पहा

ज्या वैद्यकीय महाविद्यालयांची (Medical Colleges) मान्यता केंद्र सरकारनं रद्द केली आहे, त्या महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचं काय होणार? हा मुख्य प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. याबाबत केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र तरिही महाविद्यालयांना राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे अपील करण्याचा मार्ग केंद्र सरकारनं खुला ठेवला आहे. त्यामुळे ज्या वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता रद्द झाली आहे, त्यांना राष्ट्रीय वैद्यकीय आयोगानं दिलासा दिला, तर त्या महाविद्यालयांमध्ये (Medical Colleges) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र, या वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय राष्ट्रीय वैद्यकीय आयोगानंही कायम ठेवला, तर महाविद्यालयांच्या अडचणी वाढणार आहेत. तेव्हा मात्र केंद्र सरकारला त्या महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी काहीतरी मार्ग काढावा लागेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.