Manipur Violence : मृतांच्या कुटुंबीयांना १० लाखांची भरपाई; केंद्र सरकारने केली घोषणा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) सोमवार २९ मे रोजी सकाळी मणिपूर (Manipur Violence) येथे दाखल झाले. त्यांनी मैतेई आणि कुकी या दोन्ही समुदायांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

125
Manipur Violence : मृतांच्या कुटुंबीयांना १० लाखांची भरपाई; केंद्र सरकारने केली घोषणा

गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमधील तणावाची स्थिती (Manipur Violence) कायम आहे. अशातच मणिपूरमध्ये पुन्हा एकदा विविध भागात विद्रोही गट आणि सुरक्षा दल यांच्यात चकमक झाल्याचे समोर आले आहे. माहितीनुसार, रविवारी (२८ मे ) पहाटे, दोन वाजता इम्फाल घाटीत आणि तिथल्या आजूबाजूच्या पाच भागांमध्ये एकत्र हल्ला झाला. यादरम्यान आता मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेश सिंह यांनी राज्यात ४० दहशतवादी ठार केल्याचा दावा केला आहे. शिवाय काही दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने अटक केली आहे. ही कारवाई दहशतवादी गटांविरुद्ध प्रति आणि बचावात्मक कारवाईचा भाग म्हणून करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

(हेही वाचा – Delhi Sakshi Murder Case : ”होय, मीच मारलं”, १६ वर्षीय प्रेयसीला संपवणाऱ्या साहिलची कबुली)

अशातच मणिपूरमध्ये (Manipur Violence) झालेल्या वांशिक हिंसाचारात मरण पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा मंगळवार ३० मे रोजी सरकारतर्फे करण्यात आली. भरपाईची रक्कम केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांकडून प्रत्येकी ५० टक्के दिली जाईल. याबरोबरच मृताच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी कुकी समुदायाच्या नेत्यांशी शांतता प्रस्थापित करण्याबद्दल चर्चा केली.

हेही पहा – 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) सोमवार २९ मे रोजी सकाळी मणिपूर (Manipur Violence) येथे दाखल झाले. त्यांनी मैतेई आणि कुकी या दोन्ही समुदायांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनीदेखील तेथील परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी शनिवार २७ मे पासून दोन दिवसांचा मणिपूर दौरा केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.