Shiv Rajyabhishek Sohala 2023 : शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई – गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

मुंबईकडून येणाऱ्या शिवप्रेमींच्या वाहनांसाठी सोनजई मंदिराच्या परिसरात पार्किंगची सुविधा उपलब्ध असेल.

191
Shiv Rajyabhishek Sohala 2023 : शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई - गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे (Shiv Rajyabhishek Sohala 2023) यावर्षी २ जून रोजी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला ३५०वे वर्ष होत आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात अनेक वेगवेगळे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत. संपूर्ण राज्यातून शिवप्रेमी रायगड किल्ल्यावर जाणार आहेत.

(हेही वाचा – chhatrapati shivaji maharaj : शिवराज्याभिषेक दिनासाठी सावरकर स्मारकातून पालखीचे रायगडाकडे प्रस्थान )

अशातच आता मुंबई – गोवा महामार्गासह इतर राज्य मार्गांवर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. किल्ले रायगडावर (Shiv Rajyabhishek Sohala 2023) होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ही बंदी घालण्यात आली आहे. आज म्हणजेच ३१ मे मध्यरात्री १२ वाजल्यापासून याची अंमलबजावणी होणार आहे. शिवप्रेमींना किल्ल्यावर जाण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागू नये यासाठी किल्ले रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच त्या ठिकाणी पोलीस आणि यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे.नियमानुसार, 1 आणि 2 जून तसेच 5 आणि 6 जून रोजी अवजड वाहनांना बंदी असेल. 16 टन आणि त्यापेक्षा जास्त वजन क्षमतेची जड वाहनं, ट्रक, मल्टी अ‍ॅक्सल ट्रेलरना वाहतुकीसाठी बंदी असेल.

छत्रपती शिवाजी महाराज (Shiv Rajyabhishek Sohala 2023) यांचा 6 जून 1674 या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. हा दिवस यावर्षी धुमधडाक्यात साजरा करण्यात येणार आहे. यावेळी पोलिसांकडून शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या लोकांची तीन भागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यापैकी पहिला मार्ग हा सातारा-कोल्हापूरकडून येणार आहे. सातारा, महाबळेश्वर, पोलादपूर, महाड, नातेखिंड मार्गे स्वत:ची वाहने घेऊन येणाऱ्या शिवप्रेमींसाठी कोंझर-1 आणि कोंझर 2 इथे वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही पहा – 

अशी असेल प्रवास आणि वाहन पार्किंगची व्यवस्था

तसेच दुसरा मार्ग हा मुंबईहून येणाऱ्या शिवप्रेमींसाठी (Shiv Rajyabhishek Sohala 2023) आहे. मुंबई, माणगाव, दालघर फाटा, कवळीचा मार्ग आणि सोनजई मंदिर असा हा प्रवास असेल. मुंबईकडून येणाऱ्या शिवप्रेमींच्या वाहनांसाठी सोनजई मंदिराच्या परिसरात पार्किंगची सुविधा उपलब्ध असेल. तर पुणे, ताम्हणी घाट, निजामपूर आणि सोनजई मंदिर असा प्रवास करत येणाऱ्या शिवभक्तांसाठीही याच ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

याशिवाय, वाळसुरे 1 येथेही पार्किंग सुविधा उपलब्ध असेल. याठिकाणी वाहने पार्क करुन शिवप्रेमींना (Shiv Rajyabhishek Sohala 2023) एसटीच्या शटल सेवेने रायगडाच्या दिशेने जाता येईल. कोंझर 3 ते पाचाड अशी एसटीची शटल सेवा सुरु राहील. एसटीने पाचाडपर्यंत पोहोचल्यानंतर शिवप्रेमींना किल्ले रायगडापर्यंतचा प्रवास पायीच करावा लागेल. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली रोप वे सेवा राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी सुरु असेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.