Bacchu Kadu Sharad Pawar Meeting : शरद पवार आणि बच्चू कडू यांच्यात बंद दाराआड चर्चा; काय आहे राजकीय दिशा

Bacchu Kadu Sharad Pawar Meeting : राजकीय चर्चा झाली नाही. बऱ्याच गोष्टी उघड करायच्या नसतात, तेवढ तारतम्य ठेवावे लागते, असे या भेटीविषयी बच्चू कडू म्हणाले.

139
Bacchu Kadu Sharad Pawar Meeting : शरद पवार आणि बच्चू कडू यांच्यात बंद दाराआड चर्चा; काय आहे राजकीय दिशा
Bacchu Kadu Sharad Pawar Meeting : शरद पवार आणि बच्चू कडू यांच्यात बंद दाराआड चर्चा; काय आहे राजकीय दिशा

आधी महाविकास आघाडीसोबत असलेल्या आणि शिंदेंच्या बंडानंतर महायुतीत गेलेल्या बच्चू कडूंची राजकीय भूमिका काय असेल, याविषयी तर्क-वितर्क लावले जात आहेत. सध्या बच्चू कडू (Bacchu Kadu) राज्य सरकारविरोधात वक्तव्ये करत असतात. मंत्रिमंडळ विस्तारात (Cabinet expansion) स्थान मिळाले नाही किंवा विस्तार होत नाही, यावरूनही कडूंनी सरकारमध्ये असूनही सरकारविरोधी वक्तव्ये केलेली आहेत. अशातच बच्चू कडू यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना चहासाठी घरी बोलावले होते.

(हेही वाचा – Devendra Fadnavis : ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत विकासाचा रोडमॅप सादर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश)

अमरावती (Amravati) दौऱ्यावर असलेले शरद पवार (Sharad Pawar) आज कडू यांच्या निवासस्थानी गेले. या वेळी बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी शरद पवार यांना संत गुलाबराव महाराज यांचा ग्रंथ आणि संत तुकाराम महाराजांची प्रतिमा भेट दिली. नयना कडू यांनी शरद पवार यांचे स्वागत केले. या वेळी बच्चू कडू आणि शरद पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याचे समोर आले आहे.

या बैठकीत काय झाले, याविषयी विचारले असता कडू म्हणाले, ”शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत थोडी राजकीय आणि सामाजिक चर्चा झाली. पण जास्त चर्चा शेतीवर झाली. राजकीय चर्चा झाली नाही. बऱ्याच गोष्टी उघड करायच्या नसतात, तेवढ तारतम्य ठेवावे लागते.” ‘पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामे हे रोजगार हमी योजनेत व्हावीत, हे तुमच्या अजेंड्यामध्ये असावे हे मी सांगितले’, असे बच्चू कडू या वेळी म्हणाले.

(हेही वाचा – Dhananjay Munde : रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या फळपीक विम्याचे पैसे ३ जानेवारी पूर्वी अदा करावे – मुंडे)

या वेळी कडू यांनी आपली पुढील राजकीय दिशा स्पष्ट केली. ”एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत त्यांच्या सोबत आहोत. शिंदे मुख्यमंत्री नसतील, तेव्हा आम्ही वेगळा निर्णय घेण्याबद्दल बघू. जिकडे आमचा राजकीय फायदा असेल, तिकडे आम्ही जाण्याचा विचार करू. जस प्रत्येक जण आपले चांगभले पहातो, तसा आम्हीही विचार करू”, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. (Bacchu Kadu Sharad Pawar Meeting)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.