Dhananjay Munde : रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या फळपीक विम्याचे पैसे ३ जानेवारी पूर्वी अदा करावे – मुंडे

रायगड जिल्ह्यातील तळा महसूल मंडळातील ७५०० शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यापैकी ३५०० शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्यात आली आहे.

116
Dhananjay Munde : रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या फळपीक विम्याचे पैसे ३ जानेवारी पूर्वी अदा करावे - मुंडे
Dhananjay Munde : रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या फळपीक विम्याचे पैसे ३ जानेवारी पूर्वी अदा करावे - मुंडे

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी झालेल्या रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे व्याजासह ३ जानेवारीपूर्वी अदा करावेत, असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिले. (Dhananjay Munde)

रायगड जिल्ह्यातील तळा महसूल मंडळातील ७५०० शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यापैकी ३५०० शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्यात आली आहे. मात्र, महसुली मंडळाच्या विभाजनाच्या तांत्रिक मुद्द्यावरून भारतीय कृषी विमा कंपनीने २९४० शेतकऱ्यांची ९ कोटी रुपये नुकसान भरपाईची रक्कम अदा केलेली नाही. (Dhananjay Munde)

(हेही वाचा – Shivsrushti : महाराष्ट्रातील ‘शिवसृष्टी’ला गुजरात सरकारकडून ५ कोटींची मदत)

त्यासंदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्या पुढाकाराने गुरुवारी (२८ डिसेंबर) मंत्रालयात कृषी मंत्री मुंडे (Dhananjay Munde) यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare), आमदार अनिकेत तटकरे, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले. तसेच भारतीय कृषी पीक विमा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक एम. एस. सावंत, कृषी विभागाचे (Agriculture Department) अधिकारी उपस्थित होते. (Dhananjay Munde)

यावेळी मंत्री तटकरे (Aditi Tatkare) यांनी कोकणातील इतर जिल्ह्यांपेक्षा रायगड जिल्ह्यात फळ पीक विम्याच्या हप्त्याची रक्कम मोठी असल्याकडे लक्ष वेधले. त्यावर कृषी मंत्री मुंडे (Dhananjay Munde) यांनी पुढील हंगामात हप्त्याची रक्कम सर्वत्र समान करण्याची सूचना कृषी आयुक्तांना केली. यानंतर कृषी मंत्री मुंडे (Dhananjay Munde) यांनी आंदोलकांना उपोषण मागे घेण्याचे विनंती केली. त्यानुसार उपोषण मागे घेण्यात आले. (Dhananjay Munde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.