Devendra Fadnavis : १८ हजार ३९९ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता; विदर्भातील सिंचन प्रकल्पांसाठी फडणवीस यांचा निर्णय

सिंचन प्रकल्पाचा दायित्व खर्च १०० टक्के किंवा १० कोटी पेक्षा जास्त होत असेल तर त्या ठिकाणी नव्याने निविदा काढण्यात याव्यात. या निविदा प्रक्रियांसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करावी. त्या उच्चस्तरीय समितीने नवीन निविदांना मान्यता द्यावी, अशा सूचना फडणवीस यांनी बैठकीत दिल्या.

155
Devendra Fadnavis : १८ हजार ३९९ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता; विदर्भातील सिंचन प्रकल्पांसाठी फडणवीस यांचा निर्णय
Devendra Fadnavis : १८ हजार ३९९ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता; विदर्भातील सिंचन प्रकल्पांसाठी फडणवीस यांचा निर्णय

विदर्भातील ४७ सिंचन प्रकल्पांना १८ हजार ३९९ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पांच्या माध्यमातून विदर्भातील एकूण २ लाख २३ हजार ४७४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी गुरुवारी (२८ डिसेंबर) यासंदर्भातील माहिती दिली. फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली अतिथीगृह येथे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत सुधारित विदर्भातील विविध सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यावेळी विदर्भासह कृष्णा, तापी, कोकण आणि गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची बैठक झाली. (Devendra Fadnavis)

भू संपादनाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी – देवेंद्र फडणवीस 

सिंचन प्रकल्पाचा दायित्व खर्च १०० टक्के किंवा १० कोटी पेक्षा जास्त होत असेल तर त्या ठिकाणी नव्याने निविदा काढण्यात याव्यात. या निविदा प्रक्रियांसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करावी. त्या उच्चस्तरीय समितीने नवीन निविदांना मान्यता द्यावी, अशा सूचना फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी बैठकीत दिल्या. प्रकल्पाचा सर्वाधिक खर्च हा भूसंपादन प्रक्रियेवर होत आहे. भू संपादनाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये रक्कम न्यालायात भरावी. त्यानंतर उच्चस्तरीय समिती गठित करून तडजोडीसाठी येणाऱ्या प्रकल्पग्रस्तांशी तडजोड करावी. भूसंपादनाच्या मोबदल्यात देण्यात येणाऱ्या रकमेवरील व्याज दर हा बँकेप्रमाणे देण्याचा प्रस्ताव तयार करून तो केंद्राच्या मान्यतेसाठी सादर करावा. महसूल विभागाने मुदतीत प्रस्ताव पाठवावेत. मुदतीत प्रस्ताव न पाठविणाऱ्या भूसंपादन अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले. (Devendra Fadnavis)

(हेही वाचा – Devendra Fadnavis : ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत विकासाचा रोडमॅप सादर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश)

जलाशय भागात तरंगते सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याबाबत विचार 

दोन वर्षांच्या कालावधीत निधी खर्चाचे नियोजन करावे. सिंचन प्रकल्पाचा खर्च न झालेला निधी दोन वर्षानंतर पुनर्वसनासाठी खर्च करावा. धरणाच्या भिंतीवर तसेच जलाशयाच्या भागात तरंगते सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याबाबत विचार व्हावा. यातून पाटबंधारे विभागाला महसूल मिळेल, अशी सूचना फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी बैठकीत केली. यावेळी जिगाव मध्यम प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांसाठी सुरू करण्यात आलेल्या बेसिक या ऑनलाईन प्रणालीचे आणि या प्रणालीच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. या प्रणालीच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांना त्यांचे दाखले ऑनलाइन मिळणार आहेत. (Devendra Fadnavis)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.