Chandwad Accident : नाशिकच्या चांदवडजवळ भीषण अपघातात भाजपच्या नगरसेवकाचा मृत्यू

21
Chandwad Accident : नाशिकच्या चांदवडजवळ भीषण अपघातात भाजपच्या नगरसेवकाचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यातील चांदवडजवळ भरधाव कारने कंटेनरला धडक दिल्याने भीषण अपघात (Chandwad Accident) झाला. यामध्ये कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून यामध्ये भाजपच्या नगरसेवकाचाही मृतांमध्ये भाजपच्या नगरसेवकाचा देखील समावेश आहे. धुळ्यातील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक असलेले किरण अहिरराव आणि त्यांच्या मित्रांचा जागीच मृत्यू झाला. आज म्हणजेच सोमवार १८ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

मुंबईकडून धुळे येथे जात असताना चांदवड येथील (Chandwad Accident) केदराई फाटा येथे नमोकार तीर्थासमोर उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव कारने धडक दिली. मुंबई – आग्रा महामार्गावर हा भीषण अपघात झाला. सर्व मृत हे धुळ्यातील रहिवासी होते. अपघाताची माहिती मिळताच सोमा टोल पथक आणि पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली. सर्व मृतांना तातडीने चांदवडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळविण्यात आले त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने येथील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

(हेही वाचा – Manipur : जवानाचे अपहरण करून हत्या)

या अपघातानंतर (Chandwad Accident) काही वेळ महामार्ग ठप्प झाला होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.