Aditya-L1: आदित्य एल-1 ची वैज्ञानिक डेटा गोळा करण्यास सुरुवात; इस्रोकडून नवीन अपडेट

STEPS उपकरणाच्या सेन्सर्सने पृथ्वीपासून५०,०००किमी पेक्षा जास्त अंतरावरुन सुप्रा-थर्मल आणि ऊर्जावान आयन आणि इलेक्ट्रॉन मोजण्यास सुरुवात केली आहे

140
Aditya-L1: आदित्य एल-1 ची वैज्ञानिक डेटा गोळा करण्यास सुरुवात; इस्रोकडून नवीन अपडेट
Aditya-L1: आदित्य एल-1 ची वैज्ञानिक डेटा गोळा करण्यास सुरुवात; इस्रोकडून नवीन अपडेट

आदित्य एल-1 बाबत इस्रोने मोठी अपडेट समोर आली आहे. आदित्य एल-1 (Aditya-L1) वैज्ञानिक डेटा गोळा करणे सुरू केले आहे. STEPS उपकरणाच्या सेन्सर्सने पृथ्वीपासून५०,०००किमी पेक्षा जास्त अंतरावरुन सुप्रा-थर्मल आणि ऊर्जावान आयन आणि इलेक्ट्रॉन मोजण्यास सुरुवात केली आहे. हा डेटा शास्त्रज्ञांना पृथ्वीभोवती असलेल्या कणांच्या वर्तनाचे विश्लेषण करण्यास मदत करतो. अशी माहिती इस्रोने जाहीर केली.

आदित्य एल-1 हे २ऑगस्ट रोजी सकाळी ११. ५०वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले होते. ही भारताची पहिली सूर्य मोहीम आहे. यामुळे शास्त्रज्ञांना सूर्याचे रहस्य समजण्यास मदत होईल. ISRO ने शेअर केलेल्या आलेखात ऊर्जावान कण वातावरणातील भिन्नता दर्शविल्या आहेत. एका युनिटद्वारे माहिती गोळा केली जात आहे. आदित्य L1 ने डेटा संकलनाचा हा दुसरा टप्पा आहे. लवकरच शास्त्रज्ञांना सूर्याची अनेक रहस्ये माहिती होतील. Aditya-L1 मध्ये स्थापित केलेल्या STEPS उपकरणाद्वारे हे काम केले जात आहे.या उपकरणात 6 सेन्सर्स आहेत आणि ते सर्व वेगवेगळ्या दिशांमधून सुप्रा थर्मल आणि ऊर्जावान आयनांची माहिती गोळा करतील ज्यांची श्रेणी 20 keV/न्यूक्लिओन ते 5 MeV/न्यूक्लिओन दरम्यान असेल.

(हेही वाचा :Cobra Commando : जम्मू-काश्मीरमध्ये कोब्रा कमांडोची तुकडी पहिल्यांदाच तैनात)

हे उपकरण जे डेटा देईल ते पृथ्वीभोवती असलेल्या कणांबद्दल, विशेषतः तिच्या चुंबकीय क्षेत्राची उपस्थिती जाणून घेण्यास मदत करेल. हे उपकरण 10 सप्टेंबर रोजी पृथ्वीपासून 50 हजार किमी अंतरावरून कार्यान्वित करण्यात आले, ही भारतीय शास्त्रज्ञांची मोठी उपलब्धी मानली जाते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.