दुस-या लाटेतून धडा घेऊन, तिस-या लाटेसाठी केंद्र सरकारची ‘ही’ योजना

76

कोरोनाच्या दुस-या लाटेने देशात मोठे थैमान घातले. पहिल्या लाटेपेक्षा भीषण असलेल्या या दुस-या लाटेत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. वाढत्या संसर्गामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण पडला आणि अनेकांना उपचारांअभावी राहावे लागले. आता ही दुसरी लाट ओसरली असली तरी तिस-या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या तिस-या लाटेचा सामना करण्यासाठी आता केंद्र सरकार सज्ज झाले आहे.

या औषधांचा करणार साठा

कोविड-१९च्या संभाव्य तिस-या लाटेचा धोका लक्षात घेता, सरकारने आवश्यक कोविड-१९ औषधांचा राष्ट्रीय साठा तयार करण्याची मोहीम हाती घेतली आहे. येणा-या समस्येला सामोरे जाण्यासाठी 15 प्रकारच्या औषधांचा साठा करण्याचे केंद्र सराकरने ठरवले आहे. यात अँटी-व्हायरल रेमडेसिवीर, अँटीबायोटिक्स टॉसिलिझुमॅब आणि म्युकरमायकोसिसवर उपचार म्हणून वापरले जाणारे अम्फोटेरिसिन बी या औषधांचा त्यात समावेश आहे. त्याचबरोबर ऑक्सिजनेटर आणि पल्स ऑक्सिमीटर सारख्या साधनांचाही साठा ठेवला जाणार आहे.

(हेही वाचाः ठाकरे सरकार अशी लावणार तिस-या लाटेची वाट)

काळा बाजार रोखण्यासाठी निर्णय

यावर्षी एप्रिल-जूनमध्ये आलेल्या दुसऱ्या लाटेदरम्यान कोविड -१९ औषधांचा मोठ्या प्रमाणावर काळा बाजार करण्यात आला. औषधांची सर्वात जास्त गरज असताना या काळ्या बाजारामुळे देशभरातील रेमडेसिविर आणि टॉसिलिझुमॅब सारख्या काही औषधांच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली होती. ज्याचा सामान्य माणसावर गंभीर परिणाम झाला होता. त्यामुळे यातून धडा घेत केंद्र सरकारने आता तिस-या लाटेत काळाबाजार औषधांचा रोखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत.

अशी उभारणार यंत्रणा

तिस-या लाटेचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने औषधे आणि वैद्यकीय उपकरणांच्या साठीवणुकीसाठी योजना आखली आहे. यासाठी 2.4 लाख बेड आणि 20 हजार आयसीयू तयार केले जाणार आहेत. तसेच 50 लाख रेमडेसीविरचा साठा तयार करण्याची योजना देखील आखण्यात आली आहे. त्याचसोबत ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत धोरणदेखील तयार केले गेले आहे. तिस-या लाटेचा लहान मुलांना सर्वात जास्त धोका बसण्याची शक्यता आहे अशी शक्यता वर्तवण्यात येत असल्याने, केंद्र सरकारने लहान मुलांच्या आरोग्यावर विशेष लक्ष देण्यासाठी यंत्रणा उभारली आहे.

(हेही वाचाः गो… गो… गो… ‘गोविंदा’ नाही, तर गो ‘कोरोना’ गो! दहीहंडीबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री?)

केंद्र सरकारकडून पॅकेज 

कोविड -१९ शी लढा देण्यासाठी तसेच आरोग्याच्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी जुलैमध्ये केंद्राने मंजूर केलेल्या 23 हजार 123 कोटी रुपयांच्या पॅकेजमधून या औषधांच्या राष्ट्रीय साठ्याला निधी दिला जाणार आहे. या पॅकेज अंतर्गत, केंद्राने 15 हजार कोटी रुपये आणि राज्यांनी 8 हजार 123 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. वैद्यकीय पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी ही योजना संयुक्तपणे 736 जिल्ह्यांमध्ये लागू केली जाणार आहे.

कंपन्यांना विशिष्ट औषधांचा साठा ठेवण्यास सूचना

साठा तयार केल्याने कंपन्यांना केवळ नियोजन आणि व्यवस्थापन करण्यास मदत होणार नाही, तर पुरवठा साखळी देखील बळकट होऊन, कच्चा माल आणि औषधांच्या निर्मितीतील अडचणी दूर होतील. जरी साठा खरेदी केला जात असला, तरी कंपन्यांना विशिष्ट औषधांचा पुरेसा साठा ठेवण्यास सांगितले गेले आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कोविड -१९ रुग्णांमध्ये घट होऊ लागल्यावर, कंपन्यांनी कोविड -१९ औषधांच्या उत्पादनात कपात केली होती आणि त्यामुळे जेव्हा कोविड-१९ची दुसरी लाट अनपेक्षितपणे धडकली तेव्हा संपूर्ण देशाला महागात पडले. यावेळी नागरिकांसह वैद्यकीय कामगारांना संसाधनांसाठी झुंज द्यावी लागली.

(हेही वाचाः अद्याप तरी मुंबईकर सुरक्षित! ५० हजार कोरोना चाचण्या, रुग्ण मात्र अडीचशे! )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.