लोकलमध्ये महिलांवरील अत्याचार थांबणार, रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

111

लोकल ट्रेनमध्ये महिलांवर होणा-या अत्याचारांच्या घटना या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे लोकल ट्रेनमधून प्रवास करणा-या महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. त्याचसाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. महिलांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी आता लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या डब्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे गुन्हेगारांना आळा बसण्याची शक्यता मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलाकडून वर्तवण्यात येत आहे.

सीसीटीव्ही बसवण्याचे काम सुरू

बारा डब्यांच्या लोकल ट्रेनमध्ये महिला प्रवाशांसाठी द्वितीय श्रेणीचे तीन मोठे आणि प्रथम श्रेणीचे तीन छोटे डबे असतात. अशा 589 डब्यांमध्ये एकूण 744 सीसीटीव्ही कॅमेरे मध्य रेल्वेकडून बसवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया पू्र्ण झाले असून, आतापर्यंत महिलांच्या 182 डब्यांत सीसीटीव्ही बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. आणखी काही डब्यांमध्ये कॅमेरे बसवण्याची निविदा प्रक्रिया अंतिम झाली असून, दोन ते तीन महिन्यांत हे काम पूर्ण होणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळेच वर्षअखेरपर्यंत महिलांच्या सर्व डब्यांत सीसीटीव्ही लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

(हेही वाचाः एसटीच्या 48 हजार संपकरी कर्मचाऱ्यांकडून घेतले पैसे; न्यायालयात सदावर्तेंची कबुली)

दोन वर्षांत वाढले गुन्हे

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर महिला प्रवाशांच्या बाबतीत घडणारे गुन्हे गेल्या दोन वर्षांत वाढल्याचे पहायला मिळाले आहे. लोहमार्ग पोलिसांकडे 2021 मध्ये विनयभंगाच्या 37, तर बलात्काराच्या 30 घटना नोंदवल्या गेल्या आहेत. त्यापूर्वी 2020 मध्ये विनयभंगाच्या 50 तर बलात्काराच्या तीन घटनांची नोंद करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.