Bus Accidents : भोरच्या वरंधा घाटात मोठी दुर्घटना! ६० फूट खोल दरीत कोसळली मिनी बस

109
Bus Accidents : भोरच्या वरंधा घाटात मोठी दुर्घटना! ६० फूट खोल दरीत कोसळली मिनी बस

गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. सतत कुठे ना कुठेतरी रस्ते अपघात (Bus Accidents) होत असतात. अशातच आता मिळालेल्या माहितीनुसार, भोरच्या वरंधा घाटात एक मोठा अपघात झाला आहे. एक मिनी बस थेट ६० फूट खोल दरीत कोसळली.

अधिक माहितीनुसार, पुण्याहून भोरमार्गे कोकणात (Bus Accidents) जाणा-या मिनी बसचा वरंधा घाटात भीषण अपघात झाला. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं नीरा देवघर धरणाच्या बॅक वॉटर परिसरात बस खोल दरीत कोसळली. यात चालकाचा मृत्यू झाला तर सर्व प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे. बस कोसळली तिथून अवघ्या ५ फुटांवर नीरा देवघर धरणाचं खोल पाणी आहे, मात्र बस झाडाझुडपात अडकल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

(हेही वाचा – Afghanistan Earthquake : अफगाणिस्तान भीषण भूकंपामुळे हाहाकार; मृत्यूचे तांडव)

हा अपघात रविवार ८ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री २ वाजता (Bus Accidents) घडला. वरंधा घाटामध्ये असलेल्या रस्त्यांना सुरक्षा कठडे नाही. रस्त्यावर नवीन येणाऱ्या चालकांना याचा अंदाज येत नाही. या कारणामुळे गेल्या काही दिवसात या रस्त्यावर अनेक अपघात झालेले दिसून येत आहे.

अपघातातील जखमींना भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. MH08AP1530 असा या अपघात झालेल्या (Bus Accidents) खासगी बसचा नंबर आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.