Flipkart Big Billion Days Sale : ४५,००० हजारांचा आयफोन १४ कसा मिळेल १५,९९९ रुपयांत 

फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज् सेलमध्ये आयफोन १४ काही दिवसांसाठी ४९,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. त्यावर आणखी सवलत कशी मिळू शकेल जाणून घेऊया… 

68
Flipkart Big Billion Days Sale : ४५,००० हजारांचा आयफोन १४ कसा मिळेल १५,९९९ रुपयांत 
Flipkart Big Billion Days Sale : ४५,००० हजारांचा आयफोन १४ कसा मिळेल १५,९९९ रुपयांत 

ऋजुता लुकतुके

फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज् सेल (Flipkart Big Billion Days Sale) येत्या ८ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. आणि यात ॲपल १४ फोनवर भरपूर सवलत देण्यात आली आहे. याशिवाय इतरही फोनची मॉडेल आणि वस्तूंवर भरघोस सवलत मिळणार आहे. ॲपल १५ लाँच झाल्यामुळे आधीच ॲपल १४ वर सवलत मिळायला सुरुवात झाली आहे. आता फ्लिपकार्टवर हाच फोन अगदी १५,९९९ रुपयांत तुम्हाला मिळू शकेल. ८ ते १५ ऑक्टोबर दरम्यान हा बिग बिलियन डेज् सेल चालणार आहे. आयफोनची सवलत कशी मिळवायची ते आता पाहू.

अलीकडेच आयफोन १४च्या किमती ६९,००० रुपयांवरून ५२,९९९ रुपयांपर्यंत खाली आल्या आहेत. या शिवाय काही अटी तुम्ही पूर्ण करू शकलात तर तुम्हाला आणखी सवलत या फोनवर मिळू शकेल. त्यासाठी फ्लिपकार्टने तीन आव्हानं देऊ केली आहेत. ती पार केलीत तर अतिरिक्त ३,००० रुपयांची सूट तुम्हाला मिळू शकेल.

(हेही वाचा- Ramdas Athawale : गोरेगाव दुर्घटनेप्रकरणी रामदास आठवले यांनी केली ‘ही’ मागणी)

यातील पहिलं आव्हान असं आहे, ‘तुमच्या बॉसने भारत वि. अफगाणिस्तान सामना बघण्यासाठी तुम्हाला सुटी दिली तर तुम्ही आयफोन १४ वर ४,००० रुपयांची सवलत घेऊन जाऊ शकता.’ त्यानंतर फ्लिपकार्टने विमानात आपलं पुढील आव्हान ऐकवलं. विमान लँड झाल्यानंतरही तुम्ही जागेवरच बसून राहिलात तर तुम्हाला आयफोन १४ वर आणखी ३,००० रुपयांनी कमी होणार होती. यासाठी कंपनीने स्पाईसजेट या विमान कंपनीशी करार केला आहे.

आता कंपनीने जाहीर केलं आहे की, तीनही आव्हानं पार झाली आहेत आणि आता आयफोन १४ फ्लिपकार्टवर ४९,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. अर्थात, हा सवलतीचा दर बिग बिलियन डेज् च्या दिवसांत लागू असेल.

या शिवाय फ्लिपकार्टने आयफोनवर एक्चेंज ऑफरही देऊ केल्या आहेत. जर तुमचा जुना आयफोन चालू अवस्थेत असेल तर तो तुम्ही एक्सचेंजही करू शकता. तुमच्याकडे असलेला आयफोन १४ मॅक्स प्रो एक्सचेंज केलात तर तुम्हाला थेट ४१,१५० रुपयांची सवलत मिळेल.

आयफोनचा प्रो मॅक्स फोन हा हाय-एंड फोन आहे. त्यामुळे तो एक्सचेंज करण्याची शक्यता कमीच असल्यामुळे खरी ऑफर मिळणार आहे ती जुना आयफोन देऊन नवीन घेण्याची.

यात तुम्ही जुना आयफोन १४ नवीन आयफोन १४ साठी एक्सचेंज केलात तर तुम्हाला ३४,००० रुपयांची सवलत मिळेल. आणि अशा एक्सचेंजमध्ये नवीन आणि अपडेटेड आयफोन १४ तुम्हाला मिळेल फक्त १५,९९९ रुपयांमध्ये. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज् दरम्यान हा सवलतीचा दर लागू असेल.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.