Santa Cruz Chembur Junction : सांताक्रूझ चेंबूर जोडरस्त्यावरील ५ बांधकामांवर बुलडोझर

मुंबई महानगरपालिकेच्या कुर्ला ‘एल’ विभागाअंतर्गत लाल बहादूर शास्त्री मार्गावर सांताक्रुझ चेंबूर जोडरस्त्याची एक मार्गिका घाटकोपरच्या दिशेने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

3209
Santa Cruz Chembur Junction : सांताक्रूझ चेंबूर जोडरस्त्यावरील ५ बांधकामांवर बुलडोझर
Santa Cruz Chembur Junction : सांताक्रूझ चेंबूर जोडरस्त्यावरील ५ बांधकामांवर बुलडोझर

सांताक्रूझ चेंबूर जोडरस्ता प्रकल्पअंतर्गत लालबहादूर शास्त्री मार्गावर एका मार्गिकेचे काम हे मुंबई महानगरपालिकेमार्फत सुरु असून या जोडरस्त्याच्या कामात कुर्ला एल विभागाच्या हद्दीतील पाच बांधकामे अडथळा ठरत होती. मुंबई महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि पोलीस यांनी एकत्रित कार्यवाही करून ही पाच बांधकामे मंगळवारी (१९ डिसेंबर) तोडण्यात आली. त्यामुळे आता या जोडरस्त्याच्या कामाला वेग मिळणार आहे. (Santa Cruz Chembur Junction)

(हेही वाचा – Iceland Volcano : ‘या’ देशात २४ तासांत झाले ८०० हून अधिक भूकंप; रस्त्यात मध्येच पडली मोठी भेग)

मुंबई महानगरपालिकेच्या कुर्ला ‘एल’ विभागाअंतर्गत लाल बहादूर शास्त्री मार्गावर सांताक्रुझ चेंबूर जोडरस्त्याची एक मार्गिका घाटकोपरच्या दिशेने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या पूल विभागाकडून हे काम करण्यात येत आहे. लाल बहादूर शास्त्री मार्गावर मार्गिका उपलब्ध करून दिल्याने सांताक्रुझच्या दिशेने येणाऱ्या वाहनचालकांना घाटकोपरला जाण्याचा मार्ग सुलभ होणार आहे. (Santa Cruz Chembur Junction)

(हेही वाचा – MP Suspension : खासदार निलंबनाच्या विरोधात २२ ला देशव्यापी आंदोलन)

या प्रकल्पअंतर्गत अडथळा ठरणाऱ्या पाच बांधकामावरील तोडक कारवाई करण्यासाठीचे निर्देश उपायुक्त (परिमंडळ ५) हर्षद काळे आणि एल विभागाचे सहायक आयुक्त धनाजी हेर्लेकर यांनी दिले होते. त्यानुसार महानगरपालिकेचे अभियंते, १५ कामगार, दोन जेसीबी आणि पोलीस दलाच्या मदतीने ही तोडक कारवाई मंगळवारी १९ डिसेंबर २०२३ पार पडली. (Santa Cruz Chembur Junction)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.