Iceland Volcano : ‘या’ देशात २४ तासांत झाले ८०० हून अधिक भूकंप; रस्त्यात मध्येच पडली मोठी भेग

हेगाफेल Iceland ची राजधानी रेकजाविकपासून फक्त ४० किलोमीटर अंतरावर जमिनीला मोठे तडे गेले आहेत. शहरातील चार-पाच हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

172
Iceland Volcano : 'या' देशात २४ तासांत झाले ८०० हून अधिक भूकंप; रस्त्यात मध्येच पडली मोठी भेग
Iceland Volcano : 'या' देशात २४ तासांत झाले ८०० हून अधिक भूकंप; रस्त्यात मध्येच पडली मोठी भेग

आइसलँडमधील ग्रिन्डाविक शहरातील जमिनीला मोठे तडे गेले आहेत. (Iceland Volcano) दोन महिने जमिनीतून सतत वायू बाहेर आल्यानंतर सतत भूकंपाचे (earthquakes) धक्केही बसत होते. यानंतरच रस्त्यात मध्येच भेग पडली आहे. ही भेग साडेतीन किलोमीटर लांब आहे. यातून गरम लाव्हाही बाहेर येत आहे.

(हेही वाचा – Ravindra Chavan : रस्त्यांच्या प्रगतीची माहिती आता पोर्टलवर; रवींद्र चव्हाण यांची माहिती)

दोन महिन्यांपूर्वी आइसलँडमधील ग्रिन्डाविक (Grindavik) शहरातील जमीन हादरत होती. या वेळी यातून गरम वायू बाहेर पडत होते. या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक होण्याच्या २४ तास आधी ८०० हून अधिक वेळा भूकंप झाले. ही घटना ग्रिन्डाविक शहरातील हेगाफेलच्या उत्तरेला झाली.

३५३० ते ७०६० घनफूट प्रति सेकंद वेगाने लावा बाहेर

हेगाफेल Iceland ची राजधानी रेकजाविकपासून फक्त ४० किलोमीटर अंतरावर आहे. शहरातील चार-पाच हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

रस्त्यावर पडलेल्या या भेगेतून ३५३० ते ७०६० घनफूट प्रति सेकंद या वेगाने लावा सतत बाहेर पडत आहे. प्रशासनाने लोकांना या भागाजवळ जाण्यास प्रतिबंध केला आहे. (Iceland Volcano)

(हेही वाचा – Madhya Pradesh Assembly : मध्यप्रदेश विधानसभेतून हटवले जवाहरलाल नेहरूंचे तैलचित्र)

एका महिन्यात हजारो भूकंपांची नोंद

ग्रिंडाविकमध्ये (Grindavik) आइसलँडची सर्वाधिक लोकसंख्या आहे. देशाच्या हवामान खात्याने सांगितले की, ज्वालामुखीचा उद्रेक होण्यापूर्वी येथे गेल्या एका महिन्यात हजारो भूकंपांची नोंद झाली आहे.

2021 आणि 2022 मध्येही झाला होता उद्रेक

मार्च 2021 मध्येही याच भागात ज्वालामुखीचा मोठा उद्रेक (large volcanic eruption) झाला होता. त्यानंतर सुमारे 6 महिने दरडीतून लावा वाहत राहिला. यानंतर, ऑगस्ट 2022 मध्ये आणखी एक स्फोट झाला. त्यानंतरही लावा तीन आठवडे वाहत होता. (Iceland Volcano)

(हेही वाचा – Gautam Navlakha Bail : शहरी नक्षलवादी गौतम नवलखा यांना जामीन मंजूर; NIA आव्हान देणार का ?)

आइसलँडमध्ये 33 सक्रिय ज्वालामुखी

आइसलँडची लोकसंख्या सुमारे 4 लाख आहे आणि 140 ज्वालामुखी आहेत. त्यापैकी सुमारे 33 सक्रिय ज्वालामुखी (active volcano) आहेत. देश दोन टेक्टोनिक प्लेट्सवर वसलेला आहे. या प्लेट्स स्वतःच समुद्राखाली असलेल्या पर्वतराजीद्वारे विभागल्या जातात. या पर्वतातून मॅग्मा सतत बाहेर पडत असतो. (Iceland Volcano)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.