Gautam Navlakha Bail : शहरी नक्षलवादी गौतम नवलखा यांना जामीन मंजूर; NIA आव्हान देणार का ?

न्यायमूर्ती अजय गडकरी, न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांच्या खंडपिठाने शहरी नक्षलवाद प्रकरणी Gautam Navlakha यांच्या जामीनाचा आदेश संमत केला आहे. नवलखा हे बंदी घातलेल्या माओवादी संघटनेचे सदस्य होते, असे निरीक्षण न्यायालयाने या आधी व्यक्त केले होते.

122
Gautam Navlakha Bail : शहरी नक्षलवादी गौतम नवलखा यांना जामीन मंजूर; NIA आव्हान देणार का ?
Gautam Navlakha Bail : शहरी नक्षलवादी गौतम नवलखा यांना जामीन मंजूर; NIA आव्हान देणार का ?

शहरी नक्षलवाद प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा (Gautam Navlakha Bail) यांचे माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोप राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (NIA ने) केला आहे. या आरोपात प्रथमदर्शनी तथ्य असल्याचे पुरावे आहेत, असे निरीक्षण या आधी मुंबई सत्र न्यायालयातील (Bombay Sessions Court) विशेष एनआयए कोर्टाने नोंदवून त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर नवलखा यांना नवी मुंबईतील घरात नजरकैदेत ठेवण्यात आले होते. आता मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) त्यांना जामीन मंजूर केला आहे. एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Nirmala Sitharaman: गुगल प्ले स्टोअरवरून २,५०० अॅप्स काढून टाकले, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची माहिती; कारण वाचा सविस्तर…)

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने मागितला ६ आठवड्यांचा वेळ

या जामीनाला सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आव्हान देण्याकरता ६ आठवडे स्थगितीची मागणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने केली आहे. मात्र उच्च न्यायालयाने ही मागणी अंशतः मान्य करून अंमलबजावणीसाठी तीन आठवड्यांची स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती अजय गडकरी, न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांच्या खंडपिठाने शहरी नक्षलवाद प्रकरणी गौतम नवलखा यांच्या जामीनाचा आदेश दिला.

एनआयएने फेटाळला होता अर्ज

नवलखा यांनी नियमित जामीनासाठी केलेला अर्ज विशेष एनआयए न्यायालयाने नामंजूर केला होता. त्यानंतर नवलखा यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर उच्च न्यायालयाने पुन्हा सुनावणी घेत तातडीने निकाल देण्याचे आदेश एनआयए न्यायालयाला दिले होते. त्यानुसार एनआयए कोर्टाने (NIA Court) यावर नव्याने सुनावणी घेत नवलखा यांचा जामीन पुन्हा फेटाळून लावला होता. (Gautam Navlakha Bail)

(हेही वाचा – Sushma Andhare : सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव; विधानसभेत देवयानी फरांदे आक्रमक)

नवलखा यांच्याविषयी न्यायालयाची गंभीर निरीक्षणे

नवलखा हे बंदी घातलेल्या माओवादी संघटनेचे सदस्य होते, असे निरीक्षण न्यायालयाने या आधी व्यक्त केले होते. तपासयंत्रणेने याबाबत दाखल केलेल्या आरोपपत्रातील कागदपत्रांवरून नवलखा या संघटनेचे सक्रिय सदस्य होते, असे दिसते. नवलखा यांच्याकडून अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. आरोपपत्रात असलेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट होते की, नवलखा हे या गुन्ह्यात आणि कटकारस्थानातही सहभागी होते. याशिवाय अन्य आरोपींप्रमाणे ते शस्त्रास्त्र प्रशिक्षणातही सामील होते, असेही निरीक्षणही कोर्टाने नोंदवले होते.

काश्मिर मुक्त संघटनेचा सय्यद गुलाम नबी फई याच्यासोबत नवलखा यांचे संबंध असल्याचा आरोपही एनआयएने केला आहे. (Gautam Navlakha Bail)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.