MP Suspension : खासदार निलंबनाच्या विरोधात २२ ला देशव्यापी आंदोलन

आधी जिंकायचे आहे; पंतप्रधान पदाचा विचार नंतर - खरगे

144
MP Suspension : खासदार निलंबनाच्या विरोधात २२ ला देशव्यापी आंदोलन
MP Suspension : खासदार निलंबनाच्या विरोधात २२ ला देशव्यापी आंदोलन

इंडी आघाडीकडे (I.N.D.I. Alliance) खासदारांची पुरेशी संख्याच नसेल तर पंतप्रधान पदाच्या उमेदवाराची चर्चा करून काय उपयोग. यामुळे आघाडीचा भर जास्तीत जास्त खासदार निवडून कसे आणता येईल यावर आहे, असे मत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी व्यक्त केले. (MP Suspension)

दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये मंगळवारी (१९ डिसेंबर) इंडी आघाडीची (I.N.D.I. Alliance) चौथी बैठक बोलाविण्यात आली होती. यात २८ पक्षांच्या नेत्यांनी भाग घेतला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काल सोमवारीच दिल्लीत दाखल झाले होते. आजची बैठक संपल्यानंतर बैठकीतून बाहेर येणारे ते पाहिले नेते होय. ते सहा वाजून दोन मिनिटाला बाहेर पडले. (MP Suspension)

सरकारच्या हुकूमशाही विरोधात आंदोलन

या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना खरगे (Mallikarjun Kharge) म्हणाले की, केंद्र सरकारने (Central Govt) विरोधी पक्षाच्या १५१ खासदारांना निलंबित केले आहे. भारताच्या इतिहासात ही बाब पहिल्यांदाच घडली आहे. सरकारच्या या हुकूमशाही विरोधात २२ डिसेंबरला देशभरात आंदोलन केले जाणार आहे. आघाडीतील पक्षांमध्ये जागा वाटपाच्या मुद्यावर बोलताना खरगे (Mallikarjun Kharge) यांनी सांगितले की, आघाडीतील पक्ष आधी राज्य पातळीवर जागा वाटपाची चर्चा करणार आहेत. काही जगावरून प्रश्न निर्माण झाले तर त्याचा निर्णय दिल्लीतील नेत्याकडून घेतला जाईल. (MP Suspension)

(हेही वाचा – BMC : अधिवेशनासाठी नागपूर येथे दोन रुमची व्यवस्था करण्यासाठी शासनाची महापालिकेला विनंती)

दरम्यान, तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाच्या नेत्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत खरगे यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार बनविण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यावर बोलताना खरगे (Mallikarjun Kharge) म्हणाले की, खासदारांची संख्याच नसेल तर पंतप्रधानपदाचा उमेदवार होऊन काय उपयोग? यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत आघाडीच्या जास्तीत जास्त खासदार कसे निवडून आणता येईल यावर आमचा भर असल्याचे खरगे (Mallikarjun Kharge) म्हणाले. पंतप्रधान पदाच्या मुद्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे ते म्हणाले. (MP Suspension)

इंडी आघाडीची (I.N.D.I. Alliance) ही चौथी बैठक होती. यापूर्वी पाटणा, बंगलोर आणि मुंबईत बैठक झाली होती. आजच्या बैठकीत सकारात्मक अजेंडा निश्चित करणे, जागा वाटप, निवडणुकीची रणनीती नव्याने तयार करणे, जाती आधारित जनगणना, किमान समर्थन मूल्य हमी, मजुरांना सामाजिक सुरक्षा आणि देशभरातसंयुक्त सभा घेणे या मुध्यावर चर्चा झाली. (MP Suspension)

(हेही वाचा – IPL Auction 2024 : कमिन्सला मागे टाकून मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सगळ्यात महागडा खेळाडू)

हे बैठकीला होते उपस्थित 

आघाडीच्या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी, संघटना महासचिव केसी वेणुगोपाल, बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार, राजीव रंजन सिंह, शिवसेना (यूबीटी) नेते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे, पीपुल्स डेमोक्रेटिक पार्टी (पीडीपी) च्या महबूबा मुफ्ती, अपना दलच्या (के) कृष्णा पटेल आणि पल्लवी पटेल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसी सुप्रीमो ममता बनर्जी, तमिलनाडुचे मुख्यमंत्री एमके स्टालिन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाब के मुख्यमंत्री भगवंत मान, एनसीपी सुप्रीमो शरद पवार, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद, द्रमुकचे टीआर बालू, सीपीआई-एमचे सीताराम येचुरी, राजदचे तेजस्वी यादव, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव आणि राम गोपाल यादव, सीपीआईचे डी राजा, नॅशनल कॉन्फरेन्सचे फारूक अब्दुल्ला, ईटी मोहम्मद बशीर, ई के इलांगोवन, आरएसपीचे एन के प्रेमचंद्रन, केरल कांग्रेस (एम) चे जोस के मणि, एनसीपीच्या सुप्रिया सुळे और जेएमएमच्या महुआ माजी यांनी बैठकीला हजेरी लावली. (MP Suspension)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.