Madhya Pradesh Assembly : मध्यप्रदेश विधानसभेतून हटवले जवाहरलाल नेहरूंचे तैलचित्र

मध्यप्रदेश विधानसभेतून जवाहरलाल नेहरू यांचे छायाचित्र हटवण्यात आले आहे. त्या जागी बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे.

169
Madhya Pradesh Assembly : मध्यप्रदेश विधानसभेतून हटवले जवाहरलाल नेहरूंचे तैलचित्र
Madhya Pradesh Assembly : मध्यप्रदेश विधानसभेतून हटवले जवाहरलाल नेहरूंचे तैलचित्र

मध्यप्रदेशमध्ये (Madhya Pradesh) भाजपचे सरकार आल्यानंतर विधानसभेचे पहिले विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या वेळी विधानसभेत असलेले जवाहरलाल नेहरु (Jawaharlal Nehru) यांचे तैलचित्र हटवण्यात आले आहे.

(हेही वाचा – Uttarakhand Tourism: आता पर्यटकांना घेता येणार भव्य हिमालय सफरीचा आनंद, उत्तराखंड पर्यटनने सुरू केली भारतातील पहिली एअर सफारी योजना)

आतापर्यंत विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीमागे दोन तैलचित्रे होती. त्यातील एक महात्मा गांधींचे होते आणि दुसरे पंडित नेहरुंचे (Jawaharlal Nehru) होते. यातील जवाहरलाल नेहरुंचे तैलचित्र हटवण्यात आले आहे. या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांची प्रतिमा लावण्यात आली आहे.

काँग्रेस आमदार अजय सिंह (Ajay Singh) म्हणाले की, आम्ही डॉ. आंबेडकरांच्या छायाचित्राचे स्वागत करतो, परंतु नेहरूंचे छायाचित्र सभागृहात पुन्हा बसवावे, अशी मागणीही आम्ही करतो.

(हेही वाचा – अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खानला EDची नोटीस; ३० कोटींचा घोटाळा)

काँग्रेस मीडिया विभागाचे उपाध्यक्ष अब्बास हफीज (Abbas Hafeez) यांनीही या प्रकरणी भाजपवर आरोप केले आहेत.

या वेळी मध्य प्रदेशचे मुख्य सचिव ए. पी. सिंगही उपस्थित होते. विधानसभा अध्यक्ष गिरीश गौतम यांनी खराब झालेली छायाचित्रे बदलण्याचा निर्णय घेतला होता. (Madhya Pradesh Assembly)

मध्यप्रदेशमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवले आहे. राज्यात मुख्यमंत्री मोहन यादव (Mohan Yadav), विधानसभेतील विरोधी पक्षनेते उमंग सिंगर आणि उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ला आणि जगदीश देवेडा यांनी शपथ घेतली. पाचव्या क्रमांकावर माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शपथ घेतली. भाजप आमदार नरेंद्र सिंह तोमर यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. त्यांची बिनविरोध निवड होणार आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक 20 डिसेंबरला होणार आहे.  (Madhya Pradesh Assembly)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.