Aerial Demonstrations : मुंबईकरांनी अनुभवला भारतीय हवाई दलाच्या प्रात्यक्षिकांचा थरार

Aerial Demonstrations : नयनरम्य मरिन ड्राइव्हवर मुंबईकर भारतीय हवाई दलाच्या हवाई प्रात्यक्षिकांचे साक्षीदार झाले. अनेक हवाई तळांवरून उड्डाण करणारी विमाने या प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी झाली होती.

114
Aerial Demonstrations : मुंबईत मरीन ड्राईव्ह येथे भारतीय हवाई दलाची चित्तथरारक हवाई प्रात्यक्षिके
Aerial Demonstrations : मुंबईत मरीन ड्राईव्ह येथे भारतीय हवाई दलाची चित्तथरारक हवाई प्रात्यक्षिके

भारतीय हवाई दलाने 14 जानेवारी रोजी मुंबईतील मरीन ड्राइव्ह येथे हवाई प्रात्यक्षिकांसह विविध उपक्रमांचा जनसंपर्क कार्यक्रम आयोजित केला होता. हवाई दलाबद्दल जागरुकता निर्माण करणे आणि भारतीय हवाई दल (Indian Air Force) आणि स्थानिक समुदाय यांच्यातील संबंध अधिक दृढ करणे हा या जनसंपर्क कार्यक्रमाचा प्राथमिक उद्देश होता. (Aerial Demonstrations)

(हेही वाचा – IPL & T20 World Cup Preparations : आयपीएल महत्त्वाची असल्याचं शिवम दुबे का म्हणतो?)

हवाई दलाबद्दल जागरूकता करण्याचा उद्देश

हवाई दलाची कौशल्ये, क्षमता प्रदर्शित करणे, भारतीय हवाई दलाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि तरुणांना भारतीय हवाई दल (Indian Air Force) करिअर म्हणून निवडण्यास प्रोत्साहित करणे हा देखील या कार्यक्रमाचा उद्देश होता. हा कार्यक्रम महाराष्ट्र सरकारच्या समन्वयाने आयोजित करण्यात आला होता.

मुंबईकरांनी अनुभवला थरार

नयनरम्य मरिन ड्राइव्हवर (Marine Drive) मुंबईकर भारतीय हवाई दलाच्या हवाई प्रात्यक्षिकांचे साक्षीदार झाले. अनेक हवाई तळांवरून उड्डाण करणारी विमाने या प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी झाली होती. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) हे प्रमुख पाहुणे म्हणून या वेळी उपस्थित होते. अनेक नागरी आणि लष्करी मान्यवरही या कार्यक्रमात सहभागी झाले आणि हवाई प्रात्यक्षिकांचे साक्षीदार झाले.

(हेही वाचा – Raj Thackeray : तुमची हक्काची जमीन गेली तर कपाळाला हात लावायची वेळ येईल- राज ठाकरे यांचा कोकणवसियांना इशारा)

प्रात्यक्षिकांनी खिळवून ठेवले

हवाई कसरतींमध्ये भारतीय हवाई दलाच्या प्रात्यक्षिक चमूचा समावेश होता. गिरगाव चौपाटीवर एएन -32 (AN-32) मधून आकाशगंगा चमूच्या हवाई योद्ध्यांनी स्कायडायव्हिंग (Skydiving) म्हणजेच विमानातून जमिनीच्या दिशेने उडी मारत अचूक पद्धतीने उतरून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सूर्यकिरण चमूच्या प्रभावी हवाई प्रात्यक्षिकांनीही उपस्थितांना खिळवून ठेवले. सुखोई -30 एमकेआय (Sukhoi-30 MKI) आणि सारंग हेलिकॉप्टरच्या (Sarang Helicopter) कालबद्ध आणि समक्रमित प्रात्यक्षिकांनी भारतीय हवाई दलाची उत्कृष्टता प्रदर्शित केली. (Aerial Demonstrations)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.