Board Exam Paper Checking : पेपर तपासणी थांबल्यास मुख्याध्यापक जबाबदार

संबंधित प्राचार्य - मुख्याध्यापकांनी पार्सल ताब्यात न घेतल्याने मंडळाकडे परत आल्यास त्यावर झालेला खर्च वसूल केला जाईल. संबंधित विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांची मंडळ मान्यता रद्द करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा अमरावती विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष नीलिमा टाके यांनी मुख्याध्यापकांना पाठविलेल्या आदेशातून दिला आहे.

137
Board Exam Paper Checking : पेपर तपासणी थांबल्यास मुख्याध्यापक जबाबदार

राज्यातील काही शिक्षक संघटनांनी विविध मागण्यांसाठी दहावी आणि बारावीच्या पेपर तपासणीवर (Board Exam Paper Checking) बहिष्कार टाकण्याच्या निर्णय घेतला आहे. परंतु, कोणतेही पार्सल बोर्डाच्या परवानगीशिवाय परत आल्यास आणि पेपर तपासणी थांबल्यास त्याला सर्वस्वी मुख्याध्यापकांना जबाबदार धरले जाणार आहे, तसेच अशा विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाची मान्यता रद्द केली जाणार आहे.

(हेही वाचा – Saur Kushi Vahini Scheme 2.0 : शेतकऱ्यांना आता दिवसाही विजेचा लाभ घेता येणार; ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक)

कोणत्याही परिस्थितीत उत्तरपत्रिकेचे बंडल – पार्सल परत पाठवू नयेत :

यासंबंधी विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष डॉ. नीलिमा टाके (Board Exam Paper Checking) यांच्या स्वाक्षरीचे आदेश ५ मार्च रोजी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या प्राचार्य आणि मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत. अमरावती विभागातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्य तथा मुख्याध्यापकांची बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे परीक्षण व नियमन करण्याची जबाबदारी असल्याचे या आदेशात म्हटले आहे. परीक्षण – नियमनासाठी नावे पाठविण्यात आलेले उत्तरपत्रिकांचे (Board Exam Paper Checking) पार्सल पोस्टामार्फत प्राप्त झाल्यास ते सोडवून घ्यावेत. परीक्षक नियामकांकडून परीक्षण व नियमन करून घ्यावेत. कोणत्याही परिस्थितीत उत्तरपत्रिकेचे बंडल – पार्सल परत पाठवू नयेत. परीक्षा मंडळाच्या शिक्षासूचीतील मूल्यमापनासाठी कार्यालयाकडून परिशिष्टानुसार परिरक्षक पाठविलेले उत्तरपत्रिकांचे पार्सल न स्वीकारता मंडळाच्या पूर्वपरवानगीशिवाय परत केल्यास आपल्या माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाची मंडळ मान्यता रद्द करण्याची तरतूद आहे, असे या आदेशात स्पष्ट केले आहे. (Board Exam Paper Checking)

(हेही वाचा – Apala Davakhana : मुख्यमंत्र्यांची ‘आपला दवाखान्याला’ अचानक भेट)

पार्सलचा खर्च वसूल केला जाईल

संबंधित प्राचार्य – मुख्याध्यापकांनी पार्सल ताब्यात न घेतल्याने मंडळाकडे परत आल्यास त्यावर झालेला खर्च वसूल केला जाईल. संबंधित विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांची मंडळ मान्यता रद्द करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा अमरावती विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष नीलिमा टाके यांनी मुख्याध्यापकांना पाठविलेल्या आदेशातून दिला आहे. यामुळे विभागातील प्राचार्य तथा मुख्याध्यापकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (Board Exam Paper Checking)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.