कांदिवली डहाणूकरवाडी होणार पूरमुक्त

136

कांदिवली पश्चिम डहाणूकरवाडी येथील जीवन विद्या मिशन मार्ग येथे पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाणी समस्येवर आता नवीन पर्याय शोधला आहे. पोयसर नदी पात्राचे रुंदीकरण करण्यात आल्यानंतर येथील समस्यांचे निवारण काही प्रमाणात कमी झाल्यानंतर आता येथील रस्त्यांच्या कडेला असलेल्या पावसाचे पाणी वाहून नेण्याच्या वाहिन्यांचे रुंदीकरण करण्याचे काम हाती घेण्यात येत आहे.

( हेही वाचा : शिवसेना चालते राष्ट्रवादीच्या ‘घड्याळाच्या काट्यावर’)

कांदिवली पश्चिम येथील डहाणूकर वाडीतील जीवन विद्या मिशन मार्ग हा परिसर सखल असल्याने पावसाळ्यात पोईसर नदीच्या पाण्याची पातळीत वाढ होत आहे. परिणामी नदीचे पाणी आसपासच्या परिसरात साचून पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळे पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांची क्षमता वाढण्यासाठी त्यांचे रुंदीकरण करण्यात येत असल्याची माहिती पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. एकूण ३६२ मीटर लांबीच्या नाल्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये अॅक्युट डिझाईन्स ही कंपनी पात्र ठरली आहे. कामासाठी अॅक्यूट डिझाईन्स ही कंपनी पात्र ठरली आहे. यासाठी २ कोटी ४०लाख ४३ हजार रुपये खर्च केले जाणार आहे.

कंत्राट कालावधी तसेच पावसाळ्याच्या कालावधीमध्ये कंत्राटदाराने स्वखर्चाने प्रवाहातील अडथळे दूर करणे आवश्यक आहे, तसेच नाल्यातील गाळ काढून नाल्याचा प्रवाह सुरळभ्त राखण आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. पोईसर नदी पात्रातील काही झोपड्या हटवून त्यांचे पात्र मोठे करण्यात आले आहे. याठिकाणी बांधण्यात आलेल्या पुलाचे बांधकाम चुकीच्या पध्दतीने झाल्याने या पुलाचे बांधकाम नदी पात्रातील पाण्याचा प्रवाहाला अडथळा ठरत आहे. त्यामुळे येथील अतिक्रमण हटवून नदी पात्रातील पाण्याचा प्रवाहाला गती देण्याचा प्रयत्न पूल विभागासह आर- दक्षिण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

कोणती कामे केली जाणार आहेत. . .

  • या मार्गावरील सद्यस्थितीत असलेल्या पावसाळी गटारांची रुंदी ह ०.६ मीटर ते .०९ मीटर रुंदी एवढी आहे. ही रुंदी वाढवून १.२ मीटर एवढी करणे आणि त्यांची पुनर्बांधणी करणे
  • ग्रीन आर्च सोसायटीसमोर ५ मीटर ते ३ मीटर आकाराच्या खड्डयांमध्ये पावसाचे जमा झालेले पाणी पंपाद्वारे पोईसर नदीमध्ये सोडणे
  • पोईसर नदीच्या विद्यमान काँक्रिट स्लॅबवर रस्ता बांधणे
  • ठाकूर शाळेजवळ कायमस्वरुपी रॅम्प बांधणे
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.