BMC : महापालिका करणार व्हेईकल माऊंटेड लिटर पिकर मशीन्सचा वापर

घनकचरा विभागाच्या ताफ्यात आणखी २१ वाहनांचा होणार समावेश

1268
BMC : महापालिका करणार व्हेईकल माऊंटेड लिटर पिकर मशीन्सचा वापर

मुंबईतील मुख्य रस्त्यांसोबतच गल्लीबोळातील तसेच अंतर्गत रस्ते यांत्रिक पद्धतीने स्वच्छ करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) पुढाकार घेतला आहे. मुंबईत ठिकठिकाणी मनुष्यबळ वापरून जी ठिकाणे स्वच्छ करता येत नाहीत, अशा ठिकाणी यांत्रिकी पद्धत वापरत कचरा संकलन करणाऱ्या संयंत्रांचा (व्हेईकल माऊंटेड लिटर पिकर मशीन्स) वापर करण्यात येणार आहे. पथदर्शी प्रकल्पात एकूण सात संयंत्रे उपयुक्त ठरल्याने आणखी २१ वाहने समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (BMC)

मुंबईत स्वच्छतेची प्रक्रिया जलद

मुंबईत मुख्य रस्त्यांसोबतच गल्लीबोळातही सखोल स्वच्छता मोहीम राबविताना महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी अतिशय अद्ययावत आणि नावीन्यपूर्ण अशा तंत्रज्ञानाचा वापर करून परिसर स्वच्छतेला प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामध्ये मेकॅनिकल पॉवर स्विपिंग, भूमिगत कचरापेट्या, बंदिस्त कॉम्पॅक्टर वाहने आदी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबईत स्वच्छतेची प्रक्रिया जलद करण्याचा घनकचरा विभागाचा मानस आहे. (BMC)

(हेही वाचा – Congress Income Tax Penalty : काँग्रेसला झटका; 210 कोटींच्या दंडाला स्थगिती नाहीच)

सात मशिन्सची होणार खरेदी

त्याचाच भाग म्हणून पथदर्शी प्रकल्पात व्हेईकल माऊंटेड लिटर पिकर मशीन्सचा चांगला वापर आढळून आल्याने आता अतिरिक्त संयंत्रे या महानगरपालिकेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. महानगरपालिकेच्या एम पूर्व, एन, जी उत्तर, डी, आर दक्षिण, के पश्चिम, एच पूर्व या विभागात सध्या सात संयंत्रे कार्यरत आहेत. या सातही विभागांमध्ये या संयंत्रांची कामगिरी समाधानकारक असल्यामुळे इतर विभागीय कार्यालयांसाठी प्रत्येकी एक यानुसार संयंत्रे घेण्यात येतील, अशी माहिती उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) (अतिरिक्त कार्यभार) संजोग कबरे यांनी दिली. (BMC)

व्हेईकल माऊंटेड लिटर पीकर मशीन्सचा वापर

मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) माध्यमातून दैनंदिन स्वच्छतेमध्ये रस्ते आणि पदपथ स्वच्छ करणे हे काम प्रामुख्याने होत असते. नागरी आरोग्य उत्तम रहावे, याकरीता दैनंदिन स्वच्छतेसाठी संपूर्ण मुंबईत घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ कार्यरत असते. परंतु अनेकदा अतिशय अडगळीच्या जागी स्वच्छतेसाठी येणाऱ्या मर्यादा पाहता या व्हेईकल माऊंटेड लिटर पीकर मशीन्सचा वापर करण्यात येणार आहे. या संयंत्रांचा वापर हा विविध प्रकारचा कचरा गोळा करण्यासाठी होतो. (BMC)

आदीसाठी मशिन्सचा वापर ठरणार उपयुक्त

प्रामुख्याने प्लास्टिक, कागद, धूळ, वाळू, काचेचे तुकडे, बॉटल्स, कॅन, नारळ, तरंगता कचरा आदी गोळा करण्यासाठी या मशीन्स अतिशय उपयुक्त आहेत. ‘व्हॅक्यूम सक्शन’ पद्धतीने या मशीन्स कचरा ओढून घेण्याचे काम करतात. खुल्या वाहिन्या, अडगळीतील रस्ते आणि ठिकाणे याठिकाणीही मशीन उपयुक्त आहे. खेचून घेतलेला कचरा हा बंदिस्त ठिकाणी (कलेक्शन हॉपर) जमा करणे यामुळे शक्य होते. (BMC)

(हेही वाचा – High Court: अॅट्रॉसिटी प्रकरणांची सुनावणी करताना ऑडियो व्हिडियो रेकॉर्डिंग अनिवार्य, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश)

कचरा गोळा करण्यासाठी उपयुक्त

या मशीन्सचा उपयोग हा खुल्या जागेवरील कचरा अतिशय अल्पावधीत गोळा करण्यासाठी तसेच परिसर स्वच्छतेसाठी करणे शक्य आहे. रस्त्यावरील कचरापेट्या, पदपथ, उद्याने आदी ठिकाणीही कचरा गोळा करण्यासाठी संयंत्रे उपयुक्त आहेत. (BMC)

मशीनची काय आहेत वैशिष्ट्ये

ओला आणि सुका अशा दोन्ही प्रकारचा कचरा उचलण्याची मशीनची क्षमता आहे. सुमारे १४२० लिटर इतकी कचरा साठवण्याची या मशीनची क्षमता आहे. तसेच कचरा ओढण्यासाठीच्या पाईपची लांबी ९.३ फूट इतकी आहे. तसेच २४० डिग्री इतके फिरू शकते. तसेच हे वाहन १८२५ किलो इतकी क्षमता हाताळण्याच्या क्षमतेचे आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.