Loksabha Election 2024 : नागपूरमधून नितीन गडकरीच, तर बीडमधून पंकजा मुंडेंना उमेदवारी; भाजपाची दुसरी यादी जाहीर

Loksabha Election 2024 : महायुतीमध्ये जागावाटपाविषयी काही अंतिम ठरत नसल्यामुळे जागावाटपाची वाट न बघता भाजपाने महाराष्ट्रामधील (Maharashtra) २० उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

272
Loksabha Election 2024 : नागपूरमधून नितीन गडकरीच, तर बीडमधून पंकजा मुंडेंना उमेदवारी; भाजपाची दुसरा यादी जाहीर
Loksabha Election 2024 : नागपूरमधून नितीन गडकरीच, तर बीडमधून पंकजा मुंडेंना उमेदवारी; भाजपाची दुसरा यादी जाहीर

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने (BJP) काही दिवसांपूर्वीच पहिली यादी जाहीर केल्यावर उर्वरीत जागेबद्दल काय निर्णय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता भाजपाकडून महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. तसेच तेलंगाणाचे उमेदवारदेखील (bjp candidates) जाहीर करण्यात आले आहेत. (Loksabha Election 2024)

महायुतीमध्ये जागावाटपाविषयी काही अंतिम ठरत नसल्यामुळे जागावाटपाची वाट न बघता भाजपाने महाराष्ट्रामधील (Maharashtra) उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधील जागावाटपाचा तिढादेखील लवकरच सुटण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – Haffkine ला विधानसभा अध्यक्षांची सदिच्छा भेट; कर्मचाऱ्यांना मिळणार आश्वासित प्रगती योजनेचा लाभ)

कोणाला कुठून उमेदवारी ?

डॉ. हिना विजयकुमार गावित – नंदुरबार

डॉ. सुभाष रामराव भामरे – धुळे

स्मिता वाघ – जळगांव

रक्षा निखिल खडसे – रावेर

अनुप धोत्रे – अकोला

रामदास चंद्रभानजी तडस – वर्धा

नितीन जयराम गडकरी – नागपूर

सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर

प्रतापराव पाटील चिखलीकर – नांदेड

रावसाहेब दादाराव दानवे – जालना

डॉ. भारती प्रवीण पवार – दिंडोरी

कपिल मोरेश्वर पाटील – भिवंडी

पियुष गोयल – उत्तर मुंबई

मिहिर कोटेचा – उत्तर पूर्व मुंबई (इशान्य मुंबई)

मुरलीधर किशन मोहोळ – पुणे

डॉ. सुजय राधाकृष्ण विखे-पाटील – अहमदनगर

पंकजा मुंडे – बीड

सुधाकर तुकाराम शृंगारे – लातूर

रणजितसिंह हिंदुराव नाईक-निंबाळकर – माढा

संजयकाका पाटील – सांगली

मुंबईच्या दोन विद्यमान खासदारांचे तिकीट कापण्यात आले आहे, तर पंकजा मुंडे यांची नाराजी दूर करीत खासदार प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना तिकीट देण्यात आले आहे.  (Loksabha Election 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.