Sachin Tendulkar : शेजाऱ्यांनी सचिन तेंडुलकरला केली बांधकामाचा आवाज कमी करण्याची विनंती

सचिन तेंडुलकरच्या एका शेजाऱ्याने सोशल मीडियावर सचिन तेंडुलकरला टॅग करून एक पोस्ट केली आहे

406
Sachin Tendulkar : शेजाऱ्यांनी सचिन तेंडुलकरला केली बांधकामाचा आवाज कमी करण्याची विनंती
Sachin Tendulkar : शेजाऱ्यांनी सचिन तेंडुलकरला केली बांधकामाचा आवाज कमी करण्याची विनंती
  • ऋजुता लुकतुके

सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) लहान असताना त्याचे शेजारीही तक्रार करत असतील सचिनने मारलेल्या उंच चेंडूंमुळे घराच्या काचा तुटल्याची. पण, तशीच वेळ मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरवर (Sachin Tendulkar) पुन्हा एकदा आली आहे. आणि यावेळी क्रिकेट नाही तर वांद्रे इथं त्याच्या घरी सुरू असलेल्या बांधकामाविषयी ही तक्रार त्याच्या शेजाऱ्याने सोशल मीडियावर केली आहे. दिलीप डिसुझा यांनी ट्विटरवर टाकलेला हा संदेश व्हायरलही झाला आहे. सचिन पेरी क्रॉस रोडवरील त्याच्या जागेत काही बांधकाम करत आहे. आणि महानगरपालिकेनं घालून दिलेल्या वेळ मर्यादेच्या नंतरही तिथं काम सुरूच असल्याची तक्रार डिसुझा यांनी केली आहे.

(हेही वाचा – T20 World Cup 2024 : टी-२० विश्वचषकासाठी भारतीय जर्सीचं अनावरण एका अनोख्या ढंगात)

डिसुझा या संदेशात लिहिलात, ‘जवळ जवळ रात्रीचे नऊ झाले आहेत. आणि सकाळपासून तुझ्या घराच्या बाहेर सुरू असलेला सिमेंट मिक्सर अजूनही तितकाच मोठा आवाज करत आहे. कृपया, तुझ्याकडे काम करत असलेल्या कामगारांना तू संध्याकाळ नंतर काम थांबवायला सांगशील का?’ हा संदेश काही तासातच व्हायरल झाला आहे. आणि नेटिझन्सनी त्याला उत्तर द्यायलाही सुरुवात केली आहे.

‘रात्री दहा वाजेपर्यंत बांधकाम करायला परवानगी आहे. तू कधी यापूर्वी घर बांधलेलं नाहीस का? सिमेंटचं काम सुरू असताना आवाज हा होतोच,’ असं एकाने लिहिलं आहे. तर दुसऱ्या एका नेटिझनने तुला त्रास होत असेल तर संबंधित लोकांना थेट का लिहिलं नाही, इथं सोशल मीडियावर प्रसिद्धी का करत आहेस, असा सवालही विचारला आहे.

(हेही वाचा – Air India: एअर इंडियाने ‘बॅगेज पॉलिसी’ बदलली, किती किलो सामान वाहून नेण्याची परवानगी ?)

विशेष म्हणजे हा मुख्य संदेश लिहिल्यानंतर काही तासांनी दिलीप डिसुझा यांनी आणखी एक ट्विट करून सचिनच्या कार्यालयातून आपल्या ट्विटला उत्तर आल्याचंही कळवलं आहे. ‘सचिनच्या कार्यालयातून कालच मला फोन कॉल आला होता. आणि आवाज कमी करण्यासाठी आवश्यक ती सगळी काळजी घेऊ असं त्यांनी कळवलं,’ असं या नवीन ट्विटमध्ये डिसुझा म्हणतात.

पेरी क्रॉस रोडवर एकूण तीन बांधकामं सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.