Congress Income Tax Penalty : काँग्रेसला झटका; 210 कोटींच्या दंडाला स्थगिती नाहीच

Congress Income Tax Penalty : 13 मार्च रोजी न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकला. न्यायाधिकरणाच्या निर्णयात आम्हाला कोणतीही त्रुटी आढळत नसल्याने आम्ही याचिका फेटाळतो, असे न्यायालयाने या वेळी म्हटले आहे.

167
नाराज Congress सांगलीत उबाठाच्या उमेदवाराला पाडणार?

दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवार, 13 मार्च रोजी काँग्रेसच्या बँक खात्यांवर आयटी कारवाई थांबवण्याची याचिका फेटाळली आहे. सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती यशवंत वर्मा आणि न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव यांच्या खंडपिठाने सांगितले की, प्राप्तीकर अपीलीय न्यायाधिकरणाच्या निर्णयात अडथळा आणण्याचे कारण नाही. (Congress Income Tax Penalty)

13 मार्च रोजी न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकला. न्यायाधिकरणाच्या निर्णयात आम्हाला कोणतीही त्रुटी आढळत नसल्याने आम्ही याचिका फेटाळतो, असे न्यायालयाने (Delhi High Court) या वेळी म्हटले आहे.

(हेही वाचा – Uday Samant : दानशूर भागोजीशेठ कीर, संत गाडगेबाबांचा पुतळा लवकरच उभारणार)

आयकर विभागाने 13 फेब्रुवारी रोजी काँग्रेस पक्षाला 105 कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी नोटीस पाठवली होती. आयकर विभागाने काँग्रेसला 210 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता आणि बँक खाती गोठवली होती. काँग्रेस (Congress) नेते आणि वकील विवेक तनखा यांनी आयकर विभागाच्या कारवाईविरोधात इन्कम टॅक्स अपिलेट ट्रिब्युनलमध्ये याचिका दाखल केली होती. मात्र 8 मार्च रोजी तो फेटाळण्यात आला.

या विरोधात काँग्रेसने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, त्यावर 12 मार्च रोजी सुनावणी झाली. जर आयकर विभागाने कारवाई थांबवली नाही, तर पक्ष आर्थिक अडचणीत येईल, असे काँग्रेसने म्हटले आहे.

हा आदेश लोकशाहीवर हल्ला – अजय माकन

भाजप सरकारने यासाठी जाणीवपूर्वक लोकसभा निवडणुकीची वेळ निवडली आहे. काँग्रेसचा निधी थांबवणे हा लोकशाहीवर हल्ला आहे; कारण तो निवडणुकीपूर्वी आला आहे. आयकर अधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाच्या खात्यातून 270 कोटी रुपये जप्त केले असताना अशा परिस्थितीत निष्पक्ष निवडणुकांची अपेक्षा कशी करता येईल, असा आरोप अपीलीय न्यायाधिकरणाच्या निर्णयानंतर काँग्रेसचे कोषाध्यक्ष अजय माकन (Ajay Maken) यांनी केला आहे.

आम्ही निराश झालो आहोत – विवेक तनखा

आम्हाला यावेळी सुरक्षा आदेशाची गरज आहे. पक्ष आणि निवडणुका येतील आणि जातील पण महसूल हा सरकारचा विभाग आहे. भारताला कायद्याचे पालन करावे लागेल. एकच पक्ष असेल तर लोकशाही कशी टिकणार? बंदी न घातल्यास निवडणुकीपूर्वी पक्ष आर्थिक संकटात सापडेल. आयकर अपीलीय न्यायाधिकरणाच्या आदेशाने आम्ही निराश झालो आहोत. 20 टक्के दंड भरून सवलत देण्याची आपली भूतकाळातील परंपरा त्यांनी पाळली नाही, असे काँग्रेसचे कायदेशीर सेलचे प्रमुख विवेक तनखा यांनी म्हटले आहे. (Congress Income Tax Penalty)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.