Uday Samant : दानशूर भागोजीशेठ कीर, संत गाडगेबाबांचा पुतळा लवकरच उभारणार

कामगारांनी सक्रिय नोंदणी करावी. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आर्थिक योजना आहेत. त्यामध्ये सहभागी व्हावे. विश्वकर्मा योजनेचाही लाभ घ्यावा. लेक लाडकी, सामाजिक सुरक्षा, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचाही लाभ घ्यावा, असेही पालकमंत्री म्हणाले.

95
Uday Samant : दानशूर भागोजीशेठ कीर, संत गाडगेबाबांचा पुतळा लवकरच उभारणार

दानशूर भागोजीशेठ कीर आणि संत गाडगेबाबांचा पुतळा उभारणीसाठी जिल्हा नियोजन समितीमधून आर्थिक तरतूद केली आहे. येत्या ६ महिन्यांत हे पुतळे उभारले जातील आणि १५ ऑगस्ट रोजी लोकार्पण होईल, त्या दृष्टीने कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिले. (Uday Samant)

कामगार विभाग, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, सहायक कामगार आयुक्त कार्यालयातर्फे जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना सामंत (Uday Samant) यांच्या हस्ते अत्यावश्यक संच, सुरक्षासंच व गृहपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. येथील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमास सिंधुरत्न समृद्ध योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत, माजी नगरसेवक निमेष नायर, बिपीन बंदरकर उपस्थित होते. (Uday Samant)

(हेही वाचा – Haffkine ला विधानसभा अध्यक्षांची सदिच्छा भेट; कर्मचाऱ्यांना मिळणार आश्वासित प्रगती योजनेचा लाभ)

२१ योजनांचा लाभ मिळेल – सामंत

पालकमंत्री सामंत (Uday Samant) म्हणाले, शासन तुमची, तुमच्या कुटुंबाची काळजी घेत आहे. शासनाने तरुण, महिला, ज्येष्ठ, कामगार, शेतकरी सर्वांसाठीच विविध योजना आणल्या आहेत. या सर्व योजनांचा लाभ घ्यावा. कामगारांनी आपली नोंदणी करावी. तसेच त्याचे नूतनीकरणही करावे. ती जबाबदारी पार पडावी, जेणेकरुन २१ योजनांचा लाभ मिळेल. शासनाने जाहीर केलेल्या योजनांमध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत ज्या ज्या घटना घडतात, त्यामध्ये न्याय दिला जातो. शासन या सर्व योजना आपल्यासाठी करत आहे. त्या सर्व योजनांचा लाभ घ्या. (Uday Samant)

कामगारांनी सक्रिय नोंदणी करावी. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आर्थिक योजना आहेत. त्यामध्ये सहभागी व्हावे. विश्वकर्मा योजनेचाही लाभ घ्यावा. लेक लाडकी, सामाजिक सुरक्षा, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचाही लाभ घ्यावा, असेही पालकमंत्री (Uday Samant) म्हणाले. यावेळी संजिता पवार, कृष्णा चव्हाण या पाल्यांना अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रत्येकी ६० हजाराचा तसेच कामगाराच्या मृत्यू पश्चात तेजस्वी सुर्वे वारसाला २ लाखाचा धनादेश देण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त संदेश आयरे यांनी केले. सरकारी कामगार अधिकारी राजेश जाधव यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमास कामगार विशेषत: महिलांची मोठी उपस्थिती होती. (Uday Samant)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.