BMC : गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पाचे काम राहणार सुरुच; ‘त्या’ कंपनीवर तुर्तास तरी नाही कारवाई

162

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड(जीएमएलआर) प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यातील कामांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या एस.पी. सिंगला कंस्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या बिहारमधील पुलाच्या दुघर्टनंतर मुंबईतील या जीएमएलआरच्या कामासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी होत आहे. परंतु या दुघटनेनंतरही हे काम सुरुच राहणार असून बिहारमधील पुलाच्या दुघर्टनेचा चौकशी अहवाल आल्यानंतर त्यातील प्रत्येक पैलूचा अभ्यास करून पुढील निर्णय घेतला जाईल. पण बातम्यांच्या आधारे किंवा कुणाच्या मागणीनुसार संबंधित कंत्राटदारावर कारवाई करून काम थांबवले जाणार नाही, असे महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी स्पष्ट केले.

गोरेगाव मुलुंड लिंक रोडवर उड्डाणपुलाचे  काम ज्या कंपनीला  दिले आहे, त्या कंपनीने बिहारमध्ये बांधलेल्या पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होऊन दुघर्टना झाली असली तरी त्या कामाची तुलना मुंबईतील या कामाशी करता येणार नाही असे आयुक्तांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले. या उड्डाणपुलाचा आराखडा मुंबई आयआयटीने तयार केला असून या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारही नेमला आहे. त्यामुळे या पुलाच्या बांधकामामध्ये कोणतीही अडचण नाही, असे सांगितले. बिहारमधील त्या दुघर्टनाग्रस्त पुलाची चौकशी होणार असून याच्या चौकशी अहवालात याचा आराखडा चुकीचा होता कि अन्य काही ही बाब समोर येईल. त्यामुळे चौकशी अहवालानंतर याचा अभ्यास केला जाईल, त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. पण त्यासाठी काम बंद केले जाणार नाही किंवा संबंधित कंपनीला काळ्या यादीतही टाकले जाणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा BMC : अधिकार शासनाचे, सूचना महापालिकेला: खासदार श्रीकांत शिंदे यांची महापालिका आयुक्तांसोबतच्या बैठकीत काय झाली चर्चा?)

गोरेगाव रत्नागिरी हॉटेल चौक येथे ६ पदरी उड्डाण पूल २) मुलुंड, खिंडीपाडा येथे प्रस्तावित उच्च स्तरीय चक्रीय उन्नत मार्ग: आणि ३) डॉ. हेडगेवार चौक येथे ६ पदरी उड्डाण पूल, इत्यादी कामांचे मे. एस. पी. सिंगला कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची नियुक्ती केली असून या कामांसाठी ६६६.०६ कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. परंतु बिहार राज्यातील भागलपूर जिल्हयात गंगा नदीवर उभारला जात असलेल्या पुलाचे चार ते पाच खांब. ४ जून २०२३ रोजी पूल डिझाईन आणि तांत्रिक चुकीमुळे कोसळले. हयापूर्वीही हे पूल काम सुरु असताना कोसळला होता. हे काम. १,७१० कोटी रुपयांचे होते. परंतु गोरेगाव-मुलुंड लिंक रोड हा मुंबई शहरासाठी महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम में एस. पी. सिंगला कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीने सुरु केले आहे.  परंतु हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, त्यामुळे बिहारमध्ये घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते. पर्यायाने महापालिकेचा वेळ व पैसा वाया जाणार आहे. तसेच, महानगरपालिकेच्या कामांचा दर्जा राखला जाणार नाही. त्यामुळे महानगरपालिकेने या कंपनीला कोणतेही काम देऊ नये तसेच, झालेल्या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली होती, तसेच भाजपचे आमदार राम कदम यांनीही या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.