BJP On UBT Shivsena Dasara Melava : शिवतीर्थावर अर्धवट भरलेल्या मैदानात अर्धवटरावांची सभा; भाजपाची टीका

22
BJP On UBT Shivsena Dasara Melava : शिवतीर्थावर अर्धवट भरलेल्या मैदानात अर्धवटरावांची सभा; भाजपाची टीका
BJP On UBT Shivsena Dasara Melava : शिवतीर्थावर अर्धवट भरलेल्या मैदानात अर्धवटरावांची सभा; भाजपाची टीका

शिवतीर्थावर अर्धवट भरलेल्या मैदानात अर्धवटरावांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आणि घराणेशाही वाचवण्यासाठी एकत्र आलेल्या इंडी आघाडीची वकीली केली, अशी टीका महाराष्ट्र भाजपाने केली. (BJP On UBT Shivsena Dasara Melava) उद्धव ठाकरे यांनी लक्षात ठेवावं, कोविड काळात महाराष्ट्रात लोकांना उपचार मिळत नव्हते, तेव्हा तुम्ही प्रेतांसाठीच्या बॅगामध्येही घोटाळे केले. कोविड सेंटर उभारणीत कुणी लोणी खाल्लं हे लोक विसरले नाहीत. कट कमिशनवर तुम्ही केलेल्या औषध घोटाळ्यांची चौकशी सुरू आहे. (BJP On UBT Shivsena Dasara Melava)

तुम्हाला हनुमान चालीसाबद्दल ॲलर्जी आहे म्हणून तर हनुमान चालीसा म्हणाऱ्यांना तुरुंगात डांबलं. यापुढे तुम्ही मोदीजींवर टीका केल्यास याच शब्दात तुमचा उद्धार केला जाईल. उद्धवजी एक सांगतो, तुम्हाला आता तुमचे सहकारी सुद्धा कंटाळले आहेत. तो दिवस लवकरच येईल जेव्हा तुम्ही मागे वळून बघाल तेव्हा एकही माणूस शिल्लक राहणार नाही. मी आणि माझे कुटुंब हेच तुमचे विश्व आहे आणि तेच राहील, अशी टीकाही भाजपाने केली. (BJP On UBT Shivsena Dasara Melava)
उद्धव ठाकरे “काँग्रेसी हृदयसम्राट” – शेलार

सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरात वाटले ते खरे विचारांचे सोने. शिवसैनिकांचा खरा भरगच्च मेळावा आझाद मैदात महाराष्ट्राने पाहिला. शिवतीर्थावर पूर्वी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची तोफ धडाडायची. आता “काँग्रेसी हृदयसम्राट” बालिशसाहेबांचे आपटीबार फुटतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ऐकेरी उल्लेख केलात, त्यावरुन तुमची पातळी दिसली. सोबत पंतप्रधानांनी भ्रष्टाचार, घराणेशाहीच्या विरोधात दिलेला काढ्याचा असर झालाय, हेही सगळ्यांना कळले. हल्ली मळमळ, उलट्या, अपचन यांचे करपट ढेकरांना हे विचारांचे सोने म्हणतात, अशी टीका भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली. (BJP On UBT Shivsena Dasara Melava)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.