UBT Shivsena Dasara Melava : मुंबईला तोडणाऱ्यांचे तुकडे करू; उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात मांडले जुनेच मुद्दे 

मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. तिला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न केला, तर तोडणाऱ्यांच्या शरीराचे ५ तुकडे करू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. ते २४ ऑक्टोबर या दिवशी शिवतीर्थ येथे झालेल्या दसरा मेळाव्याला संबोधित करत होते.

29
UBT Shivsena Dasara Melava : मुंबईला तोडणाऱ्यांचे तुकडे तुकडे करू; उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात मांडले जुनेच मुद्दे 
UBT Shivsena Dasara Melava : मुंबईला तोडणाऱ्यांचे तुकडे तुकडे करू; उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात मांडले जुनेच मुद्दे 

जो कोणी मुंबईला महाराष्ट्रा पासून तोडत असेल, त्याच्या शरीराचे ५ तुकडे करू ! (UBT Shivsena Dasara Melava) आम्ही आरेची ठेवलेली जागा यांनी सरकार स्थापन झाल्या झाल्या मेट्रोला दिली. कोविड सेंटरची जागा बुलेट ट्रेनला दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत लुटली होती. तुम्ही मुंबई लुटत आहात. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. तिला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न केला, तर तोडणाऱ्यांच्या शरीराचे ५ तुकडे करू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. ते २४ ऑक्टोबर या दिवशी शिवतीर्थ येथे झालेल्या दसरा मेळाव्याला संबोधित करत होते. (UBT Shivsena Dasara Melava)

(हेही वाचा – Shivsena Dasara Melava: उद्धव यांनी ‘ठाकरे’ नव्हे, ‘वाकडे’ आडनाव लावावे; ज्योती वाघमारेंची कडवट टीका)

मुंबईचे सगळे उद्योग-धंदे गुजरातला नेले. आता फिल्म सिटीही उत्तरप्रदेशला नेणार आहेत. मुंबईच्या हक्काचे नेणार असाल, तर तुम्हाला मुंबईत गाडून टाकल्याशिवाय राहणार नाही. धारावीत १५० कोटी फुटाचा fsi धारावीत मिळणार आहे. धारावीचा विकास झाला पाहिजे; पण त्याचा फायदा मराठी माणसाला झाला पाहिजे. प्रत्येक घरात असलेल्या उद्योग-धंद्यांना जागा मिळाली पाहिजे. आजही गिरणी कामगाराचा मुलगा वणवण फिरत आहोत, त्याला धारावीत घर मिळावे. मी धारावी त्यांना गिळू देणार नाही. आम्हाला हिंदुत्व जपत मुंबईवरील मराठी ठसा ठळक करायचा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. (UBT Shivsena Dasara Melava)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.