Ayodhya Shri Ram Mandir : सावरकर सदन, सावरकर स्मारक आणि अंदमानची ‘ती’ कोठडी आमच्यासाठी राष्ट्रीय मंदिरेच – भाजपचे दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर

२२ जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत आहे, त्यानिमित्ताने दादरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर सदन आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकांमध्ये दिवाळी साजरी व्हावी म्हणून पणत्यांची भेट दिल्यानंतर भाजपचे दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांनी आमच्यासाठी या दोन्ही वास्तू पवित्र वास्तू आहेत, असे म्हणाले.

577
अयोध्येतील प्रभू श्री राम जन्मभूमीतील मंदिरात (Ayodhya Shri Ram Mandir) श्री रामाच्या मूर्तीची सभारंभपूर्वक प्रतिष्ठापना केली जात असल्याने सोमवार, २२ जानेवारीला प्रत्येक मंदिरांमध्येही दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. त्यासाठी ही मंदिरे दिव्यांनी उजळून निघावीत याकरता भाजपच्या दक्षिण मध्य मुंबईच्यावतीने १०८ मंदिरांमध्ये प्रत्येकी १०८ पणत्यांचा संच भेट म्हणून दिला जात आहे. या जिल्ह्यातील मंदिरांप्रमाणेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वास्तव्य असलेले सावरकर सदन आणि  स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ही सुध्दा आपल्यासाठी राष्ट्रीय मंदिरे आहेत, अशी भावना भाजपचे दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांनी व्यक्त केली. ही दोन्ही ठिकाणेही दिव्यांनी उजळून निघावीत यासाठी इथेही १०८ पणत्यांसह कापसाच्या वाती, तेलाची बॉटल आणि अगरबत्ती तसेच श्रीरामाचा ध्वज भेट म्हणून दिले.  यावेळी माजी नगरसेविका राजेश्री शिरवडकर आणि भाजपचे वॉर्ड अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

 

भाजपचे दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांनी सोमवारी, २२ जानेवारी रोजी राम मंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्यादिवशी (Ayodhya Shri Ram Mandir) घरोघरी दिवाळी साजरी व्हावी यासाठी संपूर्ण जिल्ह्यात १ लाख १ हजार पणत्यांचा वाटप करण्याचे लक्ष्य पूर्ण केले. त्यानंतर या जिल्ह्यातील १०८ मंदिरांमध्येही सोमवारी दिवाळी साजरी व्हावी आणि मंदिरेही दिव्यांची उजळून निघावीत यासाठी १०८ पणत्यांचा संच भेट म्हणून दिला आहे. या १०८ पणत्यांच्या संचामध्ये तेलाची बॉटल, कापसाच्या वाती आणि अगरबत्ती तसेच श्री रामाचा ध्वज भेट म्हणून दिला. या  १०८ मंदिरांमध्ये दादरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर सदन आणि स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार सावरकर सदनमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांनी सदनालाही या पणत्यांचा संच आणि ध्वज भेट दिला. या पणत्यांचा संच या सदनाची देखभाल सांभाळणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कर्मचारी सागर गावडे यांनी स्वीकारले. त्यानंतर शिरवडकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट दिली. हे राष्ट्रीय स्मारकही सोमवारी उजळून निघावे म्हणून १०८ पणत्यांचा संच व ध्वज भेट म्हणून दिला आहे. स्मारकाच्यावतीने स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी या पणत्यांचा संच स्वीकारला.

 

(हेही वाचा Ayodhya: राम मंदिर बांधकामासाठी ‘इस्रो’ची मदत; वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसरीचे वापर कसा केला ? वाचा सविस्तर)

अंदनामातही दिवाळी साजरी करण्यासाठी दिली पणत्यांची भेट

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे या सोमवार, २२ जानेवारी रोजी अंदमानला जात असल्याने वीर सावरकर यांना ज्या तुरुंगात ठेवले होते, त्या तुरुंगातील कोठडीतही दिवाळी साजरी व्हावी आणि त्या दिवशी दिव्यांनी ती कोठडी प्रकाशमय व्हावी यासाठी भाजपच्यावतीने १०८ पणत्यांचा संच त्यांना भेट देऊन अंदमानात दिवे लावण्याची विनंती केली. त्यानुसार मंजिरी मराठे यांनी हे दिवे सोमवारी त्याठिकाणी लावण्याची त्यांची इच्छा पूर्ण केली जाईल, असे आश्वासन देत त्या दिव्यांची भेट स्वीकारली.

श्रीराम प्राणप्रतिष्ठापना होणे एकप्रकारे वीर सावरकरांचे स्वप्न सत्यात उतरतेय 

दादरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर सदन आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकांमध्ये दिवाळी साजरी व्हावी म्हणून पणत्यांची भेट दिल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना शिरवडकर यांनी या दोन्ही वास्तू आमच्यासाठी पवित्र वास्तू आहेत. अखंड हिंदुस्थानची स्वप्ने त्यांनी पाहिली आणि क्रांती करत अनेक क्रांतीकारक घडवले, त्या क्रांती सुर्याला नमन करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. ही दोन्ही ठिकाणी आमच्यासाठी राष्ट्रीय मंदिरे आहेत असे सांगितले. येत्या २२ जानेवारीला या आमच्या राष्ट्रीय मंदिरातही दिवे उजळावे म्हणून या दिव्यांची भेट देण्यासाठी आलो आहोत. सोमवारी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना होत असून एकप्रकारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्वप्न  सत्यात उतरत आहे. सावरकरांच्या विचाराने अनेक युवक आता पुढे येतील आणि भारतमातेला खऱ्या अर्थाने विश्वमाता बनवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अंदमान हे आमच्यासाठी तीर्थक्षेत्र असून त्या अंधारमय कोठडीत वीर सावरकरांना अनेक यातना भोगाव्या लागल्या.ते आमच्यासाठी राष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे. सावरकरांचे योगदान हे अनन्यसाधारण असे आहे. तेही आमचे राष्ट्रीय मंदिर आहे. त्या खोलीमध्येही २२ जानेवारीला दिवाळी साजरी व्हावी म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे तिथे त्याच दिवशी जात असल्याने त्या दिवशी तिथेही आमच्यावतीने हे दिवे लावले जावेत, अशी विनंती त्यांनी केली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.