‘विस्थापित’ Bachchu Kadu मराठा आंदोलनातून ‘प्रस्थापित’ होणार?

सध्या राजकीयदृष्ट्या ‘विस्थापित’ झालेल्या प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू यांचा मराठ्यांच्या आरक्षण आंदोलन माध्यमातून ‘प्रस्थापित’ होण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

147
‘विस्थापित’ Bachchu Kadu मराठा आंदोलनातून ‘प्रस्थापित’ होणार?
‘विस्थापित’ Bachchu Kadu मराठा आंदोलनातून ‘प्रस्थापित’ होणार?

सध्या राजकीयदृष्ट्या ‘विस्थापित’ झालेल्या प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांचा मराठ्यांच्या आरक्षण आंदोलन माध्यमातून ‘प्रस्थापित’ होण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (Bachchu Kadu)

चर्चेत राहण्याचा अट्टाहास

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर त्यांना पाठींबा देत महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi) बाहेर पडलेले राज्यमंत्री आणि प्रहार पार्टीचे नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी अनेक प्रयत्न करूनही शिंदे सरकारमध्ये मंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली नाही. त्यामुळे अस्वस्थ असलेल्या कडू (Bachchu Kadu) यांच्यामार्फत अधूनमधून वेगवेगळी विधाने करून चर्चेत राहण्याचा अट्टाहास कायम असतो. (Bachchu Kadu)

भूमिकेबाबत संभ्रम निर्माण करण्यात यशस्वी

अनेक दिवसांपासून ते नाराज असल्याची चर्चा होत आहे. भाजपकडून त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने तसेच त्यांचे राजकीय महत्व कमी झाल्याची चर्चा होत असल्याने, यापुढे महायुतीत कायम राहण्यावरून संभ्रम निर्माण करण्यात कडू (Bachchu Kadu) बऱ्यापैकी यशस्वी झाले. (Bachchu Kadu)

(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : ‘श्रीराम रंगी रंगले’ उत्सवात श्रीरामाची १०० फूट भव्य रांगोळी)

राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न

मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाकडे माध्यमांचे लक्ष वेधल्यानंतर कडू (Bachchu Kadu) यांनी या विषयात उडी घेत अनेकदा सरकारचा प्रतिनिधि म्हणून जरांगे पाटील यांच्या भेटीगाठी घेतल्या आणि संपर्कात राहिले. तसेच वेळोवेळी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आता जरांगे पाटील यांनी टोकाची भूमिका घेत मुंबई गाठण्याची भाषा केली. कडू यांनीही मराठा आरक्षण आंदोलनाला पाठींबा जाहीर करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचे बोलले जात आहे. (Bachchu Kadu)

काहीही झाले तरी राजकीय लाभ

राज्य सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण लागू झालेच तर त्याचे राजकीय श्रेय घेऊन आगामी निवडणुकीत कडू यांच्याकडून त्याचा वापर केला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आंदोलन अपयशी झाले तर त्याचाही राजकीय लाभ उठवण्याची कला कडू (Bachchu Kadu) यांच्यात नक्कीच आहे, असे एका मराठा आंदोलन कार्यकर्त्याने सांगितले. (Bachchu Kadu)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.