Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी टीम मुंबई भाजपा सज्ज!

कोकणातील चाकरमान्यांना ६ ट्रेन ३३८ हून अधिक बस गाड्यांची व्यवस्था

109
Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी टीम मुंबई भाजपा सज्ज!
Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी टीम मुंबई भाजपा सज्ज!

मुंबई भाजपातर्फे गणेशोत्सवाचे जोरदार स्वागत करण्यासाठी मुंबई भाजपाची टीम तयार झाली असून याही वर्षी गतवर्षी प्रमाणेच ‘मुंबईचा मोरया’ ही भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली असून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना ६ ट्रेन आणि ३३८ एसटी आणि खाजगी बस मोफत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड. आशिष शेलार यांनी बुधवारी प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर गणेशोत्सव, दहीहंडी उत्सव, नवरात्र उत्सवासह विविध सण उत्साहात जल्लोषात साजरे करण्यात येत आहेत, असेही शेलार यांनी येथे नमूद केले.

तसेच दरवर्षी प्रमाणे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना यावेळी मुंबई भाजपा तर्फे १ तर मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यातर्फे १ आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितशे राणे यांच्यातर्फे २ ( मोदी एक्सप्रेस) अशा ४ रेल्वे गाड्यांचे पुर्ण नियोजन झाले असून अजून २ गाड्या प्रस्तावीत असून एकूण ६ रेल्वे गाड्यांची सुविधा कोकणवासीयांना करण्यात आली आहे. तर येत्या १५ तारखेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्या ट्रेनला हिरवा झेंडाही दाखवणार आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

तर मुंबई भाजपातर्फे कोकणातील चाकरमान्यांसाठी २५६ एसटी बसची मोफत सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून काही नगरसेवकांनी आपापल्या विभागात खाजगी बसच्या सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अंधेरी येथून माजी नगरसेवक मुरजी पटेल यांच्यातर्फे ५१ बस सोडण्यात येत असून वांद्रे पश्चिम येथून ही ३१ एसटी बस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्यामुळे भाजपाकडून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, अलिबाग अशा कोकणातील सर्व गावापर्यंत ३३८ हून अधिक बसची सुविधा उपलब्ध करण्यात आल्याचेही शेलार यांनी नमूद केले.

मुंबई बँकेच्या सहयोगाने संपन्न होणारी

“मुंबईचा मोरया २०२३” ही स्पर्धा उत्कृष्ट मुर्ती,उत्कृष्ट सजावट/देखावा आणि उत्कृष्ट परिसर स्वच्छता या तीन गटात होणार असून असून प्रत्येक गटात पहिले बक्षीस ३ लाखांचे असून ही तीन पारितोषिके त्याचप्रमाणे प्रत्येक गटात,दुसऱ्या क्रमांकासाठी १ लाख ५० हजार रुपये तर तृतीयसाठी ७५ हजार रुपये बक्षीसे देण्यात येणार आहेत.तर ११ हजाराची १२ उत्तेजनार्थ अशी बक्षीसे तर सहभागी सर्व मंडळांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.स्पर्धेचे विजेते ठरविण्यासाठी एकुण ३० तज्ञ गटांची स्थापना करण्यात येणार असून मुर्तीची सुबकता,सजावट,स्वच्छता आणि सामाजिक संदेश या निकषांवर निष्पक्ष निर्णय घेऊन स्पर्धा समितीकडून विजेत्यांची निवड केली जाणार आहे.

भाजपा कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष सुहास आडिवरेकर आणि त्यांची टीम दिवसरात्र याचे नियोजन करीत आहे, तर विधान परिषदेचे गट नेते प्रविण दरेकर, आमदार प्रसाद लाड यांचाही या कामी मोठा पुढाकार असून भाजपाचे सर्व खासदार, आमदार, नगरसेवक, विविध मोर्चे आघाडी पदाधिकारी आणि बुथ अध्यक्षांपर्यंतचे पदाधिकारी कार्यकर्ते गणेशोत्सवाच्या तयारी एक टीम म्हणून काम करते आहे. त्यामुळे येत्या गणेशोत्सव गतवर्षी प्रमाणेच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त सहभागीता भाजपाची असून भाजपा आणि गणेशोत्सव असे एक नातेच निर्माण झालेले पहायला मिळेल, असा विश्वासही शेलार यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला महामंत्री संजय उपाध्याय, कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष सुहास आडिवरेकर, अमरजीत मिश्र, नवनाथ बन आदी उपस्थितीत होते.

(हेही वाचा – Maratha Reservation : अखेर मनोज जरांगे पाटील यांना भेटायला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जालन्यात येणार)

कोकणी माणसासाठी कोणी काय केले का?

मुंबई आमची, कोकण आमचे म्हणायचे आणि घरात कडी लावून बसायचे असा कार्यक्रम सध्या काही जणांचा सुरु आहे. तर काही जण आंदोलन करुन क्रेडिट घेण्याचाही प्रयत्न करीत असल्याचा टोलाही त्यांनी उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

आरे मध्ये कृत्रिम तलाव करणार

आरे मधल्या तलावात गणेशमूर्ती विसर्जनाला काही जणांनी बंदी असावी, असे आदेश आणले आहेत. काही लोक गणेशोत्सवात सतत विघ्न आणण्याचा प्रयत्न करतात. मात्र, आज मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि उपनगर जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आपण विनंती केली असून आरे मध्ये कृत्रिम तलाव तयार करुन विसर्जन व्यवस्था करण्यात येईल आवश्यकता भासल्यास डिपीडीसी मधून फंड खर्च करु अशी भूमिका पालकमंत्र्यांनी घेतल्याची, माहितीही आमदार शेलार यांनी दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.