IRCTC : ‘एसटी’ चे आरक्षण आता आयआरसीटीसीवरूनही करता येणार

एस. टी. महामंडळ व रेल्वेच्या आय. आर. सी. टी. सी. यांच्या दरम्यान आरक्षण व्यवस्थापन प्रणाली संदर्भात हा सामंजस्य करार करण्यात आला.

88
IRCTC : 'एसटी' चे आरक्षण आता आयआरसीटीसीवरूनही करता येणार
IRCTC : 'एसटी' चे आरक्षण आता आयआरसीटीसीवरूनही करता येणार

एसटी महामंडळाच्या बस प्रवासासाठी आता आयआरसीटीसीवरुनही आरक्षण करता येणार आहे. तसेच एसटीची सेवा रेल्वेच्या प्रवाशांना देखील सोयीची होईल यादृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये बुधवार, १३ सप्टेंबर रोजी सामंजस्य करार करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी याकरिता एसटी महामंडळ व इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सामजंस्य करारावर सह्या केल्या. महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ (एम. एस. आर. टी. सी) अर्थात एस. टी. महामंडळ व रेल्वेच्या आय. आर. सी. टी. सी. यांच्या दरम्यान आरक्षण व्यवस्थापन प्रणाली संदर्भात हा सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टुरिझम कॉर्पोरेशनच्या संकेतस्थळावरुन (https://www.bus.irctc.co.in) प्रवाशांना एसटीचे तिकीट देखील आरक्षित करता येणार आहे.

(हेही वाचा – FIR On Sudhir Chaudhary : ठाकरे सरकारकडून अर्णव गोस्वामी; आता कर्नाटक काँग्रेस सरकारकडून सुधीर चौधरी टार्गेट)

फायदा काय होणार?
  • रेल्वेच्या एकुण प्रवाशी संख्येपैकी ७५ टक्के प्रवाशी इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टुरिझम कॉर्पोरेशनच्या संकेतस्थळावरुन तिकीट आरक्षित करतात. या सर्व प्रवाशांना आता एसटी बसचे तिकीट देखील आरक्षित करणे शक्य होईल.
  • त्यामुळे एसटीच्या प्रवाशी संख्येमध्ये वाढ होणार आहे. तसेच प्रवाशांना रेल्वे आणि एसटीच्या संयुक्त प्रवासाचे नियोजन करणे शक्य होईल, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.