Ram Mandir: प्रतिष्ठापना सोहळ्यामुळे अयोध्येत ‘या’ मोठ्या कंपन्या गुंतवणुकीसाठी इच्छुक, स्थानिक उद्योग, छोट्या व्यापाऱ्यांचाही जागतिक पातळीवर ठसा उमटवण्यासाठी प्रयत्न

सुमारे 50 प्रसिद्ध हॉटेल कंपन्यांनी अयोध्येत मोठ्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली आहे. यामध्ये ताज, मॅरियट, जिंजर, ओबेरॉय, ट्रायडेंट आणि रॅडिसन यांचा समावेश आहे.

68
Ayodhya Shri Ram Mandir : प्राण प्रतिष्ठेसाठी अयोध्या सजली

देशभरात २२ जानेवारीला होणाऱ्या रामप्रतिष्ठापना सोहळ्याची लोकं वाट बघत आहेत. या उद्घाटन सोहळ्यामुळे अयोध्येतील आसपासच्या गावांचाही विकास होणार आहे. मंदिर उद्घाटनामुळे (Ram Mandir) आसपासच्या जिल्ह्यांच्या विकासाला गती मिळणारआहे.

हॉटेल उद्योग, छोटे व्यापारी आणि स्थानिक उद्योग आता जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवणार आहेत. यातून लाखो लोकांना रोजगार मिळेल. त्यामुळेच हॉटेल उद्योगात मोठ्या गुंतवणुकीसाठी आपला ठसा उमटणार आहे. यातून लाखो लोकांना रोजगार मिळेल. त्यामुळेच हॉटेल उद्योगात मोठ्या गुंतवणुकीसाठी अनेक करार करण्यात आले आहेत.

(हेही वाचा –Chief Minister Yogi Adityanath: अयोध्येत जगातील पहिल्या सेव्हन स्टार शाकाहारी हॉटेल्सचा प्रस्ताव )

एका अहवालानुसार, भारतातील प्रसिद्ध हॉटेल कंपन्या अयोध्येत त्यांच्या शाखा उघडत आहे. सध्या अयोध्येत ५० मोठ्या हॉटेलचे बांधकाम सुरू आहे. हॉटेल्स, रिसॉर्टस् आणि होमस्टेमध्ये गुंतवणुकीमुळे अयोध्या, हॉटेलचे नवे केंद्र म्हणून उदयास येत आहे याशिवाय सुस्थितीतील रस्ते, रामाचे जीवनचरित्र दर्शवणारी भिंतीवरील चित्रे, सजावट आदींमुळे अयोध्येचे आकर्षण वाढत आहे.

याविषयी अयोध्येचे विभागीय आयुक्त गौरव दयाल म्हणाले की, ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट (GIS) दरम्यान अयोध्येतील पर्यटनासाठी सुमारे १८,००० कोटी रुपयांच्या १०२ करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.

मोठ्या कंपन्या पैसे गुंतवण्यासाठी उत्सुक
सध्या अयोध्येत पर्यटनाशी संबंधित 126 प्रकल्प पूर्ण होणार आहेत. त्यापैकी 46 मध्ये सामंजस्य करार झाले आहेत, तर 80 नॉन एमओयू आहेत. या सर्व 126 प्रकल्पांची एकूण किंमत सुमारे 4,000 कोटी रुपये आहे. सुमारे 50 प्रसिद्ध हॉटेल कंपन्यांनी अयोध्येत मोठ्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली आहे. यामध्ये ताज, मॅरियट, जिंजर, ओबेरॉय, ट्रायडेंट आणि रॅडिसन यांचा समावेश आहे. बांधकामाचे काम लवकरच पूर्ण होईल. ‘राजाची इमारत’ हेरिटेज हॉटेल म्हणून विकसित करण्याचीही योजना आहे. एक मोठा हॉटेल समूह या प्रकल्पात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे.

हवाई भाडे २० हजारांवरून ३० हजार रुपयांवर पोहोचले

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या घोषणेमुले ग्राहकांकडून विविध ट्रॅव्हल्सकरिता मोठी मागणी होत आहे. यासाठी लोकांची उत्सुकताही वाढली आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरु, हैदराबाद आणि चैन्नई या केंद्रापासून अयोध्येपर्यंतचे हवाई भाडे २० हजारांवरून ३० हजार रुपयांवर पोहोचले आहे. २२ जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अयोध्येसाठी थेट परतीचे भाडे जवळपास असणाऱ्या लखनौ, प्रयागराज, वाराणसी आणि गोरखपूर शहरांच्या सरासरी भाड्यापेक्षा ३० ते ७० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.